ji24news

महिला सुरक्षा व सायबर क्राइम’ याविषयावर उपनिरीक्षक अभिषेक बागडे यांचे मार्गदर्शन…

महिला सुरक्षा व सायबर क्राइम’ याविषयावर
उपनिरीक्षक अभिषेक बागडे यांचे मार्गदर्शन….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )वर्धा वार्ताहर – प्रा. दिनेश राठोड

दिनांक १३डिसेंबर २०२२ वर्धा जिल्ह्यातील वडणेर येथे श्री.साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संरक्षण तसेच विद्यार्थिनी तक्रार निवारण समितीच्या वतीने ‘महिला सुरक्षा व सायबर क्राइम’ या विषयावर मार्गदर्शन आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.उत्तम पारेकर, प्रमुख अतिथि उपप्राचार्य डॉ. सारिका चौधरी मार्गदर्शक अभिषेक बागडी, उपनिरीक्षक पोलिस स्टेशन वडणेर, पोलिस मित्र खुशबू मॅडम, संयोजक प्रा. आरती देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
जगाच्या पाठीवर सर्वच स्त्रियांना कधी ना कधी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शोषनाचा सामना करावा लागतो. अर्थार्जन करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांना अशा अनुभवांना सामोरे जावे लागते. तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मुलांकडून अशा अनेक समस्या भेडसावत असतात तेव्हा याबाबत आपण अधिक जागृत राहून महिला अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. पोलिस मित्र आपल्या पाठीशी सदैव राहतील व आपणास सुरक्षा प्रदान करून आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. आणि आपल्यावर कोणत्याही अन्याय किंवा शोषण होणार नाही यासाठी आपण अधिक जागृत राहावे असे विचार मार्गदर्शक अभिषेक बागडी उपनिरीक्षक पोलिस स्टेशन वडणेर यांनी मांडले.
यावेळी मार्गदर्शन करताना करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उत्तमराव पारेकर म्हणाले की, विद्यार्थिनींचा कोणत्याही प्रकारचा छळ होत असल्यास त्याचा प्रतिकार करणे महिलांनी शिकले पाहिजे. यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थीनींची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थीनींनी भविष्यकाळाचा विचार न करता आजचा विचार करा व कुठलीही भीती न बाळगता अत्याचाराची माहिती त्वरित सेलच्या समन्वयक आरती देशमुख किंवा पोलिस मित्र खुशबू मॅडम वडणेर पोलिस स्टेशन यांना कळवा असे विद्यार्थीनींना निक्षून सांगितले.
कार्यक्रमाला डॉ. प्रवीण कारंजकर, डॉ. विठ्ठल घिनमीने, डॉ. नितेश तेलहांडे, डॉ. संजय दिवेकर, प्रिती सायंकार, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सारिका चौधरी यांनी, सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनोद मुडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. आरती देशमुख यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राधिका गोटेफोडे, आचल खिरटकर, रेशम खिरटकर, नेहा येलके, रुचिता वेले, स्नेहल कोटकर, पायल सेवेकर, सोनल दोडके, पल्लवी पिंपलशेंडे, तेजस आडे, उमेश चौधरी, उज्वला गुरनुले, प्रशांत निवल, अरुण तिमांडे, विजयालक्ष्मी जारोंडे, अंकुश वैद्य व माजी विद्यार्थी सचिन महाजन पत्रकार यांनी अथक परिश्रम घेतले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर