
समृद्धी महामार्गावर धावणार नागपूर ते शिर्डी बस….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )वर्धा :प्रा.दिनेश राठोड
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg) नागपूर ते शिर्डी (nagpur to Shirdi)पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले.यानंतर नागपूर ते शिर्डी जाणाऱ्या साई भक्तांसाठी एसटी महामंडळाने दररोज विशेष बस सेवेची सुरुवात करण्याची घोषणा केली. त्यानुसार दि.15 डिसेंबरपासून स्लीपर कोच बससेवा सुरू करण्यात आली आहे.
ही विशेष बस नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक (Ganeshpeth Bus Stand Nagpur) येथून दररोज रात्री नऊ वाजता निघणार असून पहाटे साडेपाच वाजता शिर्डी येथे पोहोचणार आहे. तसेच शिर्डी (Shirdi) येथूनही बस रात्री नऊ वाजता निघून पहाटे साडेपाच वाजता नागपुरात (Nagpur) दाखल होणार आहे. या बससेवेसाठी प्रति व्यक्ति 1300 रुपयांचे तिकीटदर ठरविण्यात आले असून लहान मुलांसाठी 670 इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलतही या बसमध्ये लागू असणार आहे. शिवाय 65 वर्षांवरील ज्येष्ठांना तिकीट दरात 50 टक्के सवलतही लागू असणार आहे. या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांनीही एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला तोंडी सूचना दिल्या असून लवकरच समृद्धी महामार्गावरील बस सेवेची पाहणी करणार असल्याचे सांगितले.
Total Users : 10829