
हिंगणघाट तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांनी वाढविला खेळाडूंचा उत्साह….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )वर्धा : प्रा.दिनेश राठोड.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणघाट तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
या शालेय स्पर्धांमध्ये खो-खो कबड्डी,हॉलीबॉल फुटबॉल क्रिकेट बुद्धिबळ,कुस्ती,योगा,कराटे मैदानी स्पर्धा अशा एकूण 10 खेळांचा समावेश करण्यात आला होता,विविध स्पर्धांमध्ये हिंगणघाट तालुक्यातील सर्व खेळाडूंनी सहभाग नोंदविला, सतत महिन्याभऱ्यांपासून चालत असलेल्या शालेय क्रीडास्पर्धा यशस्वी होण्यासाठी हिंगणघाट तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक तसेच मुस्तफा बक्स फुटबॉल
व खो-खो – क्रीडा संयोजक
श्री बी एल खांडरे,कबड्डी- सुभाष मंडळ सदस्य क्रिकेट-झोटिंग सर झाडे सर मैदानी स्पर्धा
जय जवान अकॅडमी,श्री तिमांडे सर,मयूर येसनसुरे योगा स्पर्धा-
श्री बोरकर सर,श्री गावंडे सर कराटे -प्रशांत बेदाडे,
हॉलीबॉल – विनोद भुते सर
कुस्ती महाबुद्धे सरआदींनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहकार्य केले,हिंगणघाट तालुक्यातील खेळाडूंनी जिल्हास्तर विभागीय आणि राज्यस्तरावर सहभाग नोंदविला आहे,सर्व विजयी खेळाडू हिंगणघाट तालुक्याचे तसेच वर्धा जिल्ह्याचे नाव संपूर्ण राज्यभर उज्वल करतील अशी अपेक्षा हिंगणघाट तालुका क्रीडा संयोजक श्री बी एल खांडरे यांनी व्यक्त केली आहे,ज्या क्रीडा शिक्षकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य केले त्याबद्दल क्रीडा संयोजक श्री बी एल खांडरे यांनी विशेष आभार मानले,
Total Users : 10829