ji24news

ठाणे विभागातील आश्रम शाळा मधील शिक्षण सेवकाना नियमित वेतनश्रेणी मंजुरीसाठी शिक्षक भारतीकडून दखल : आदिवासी विकास विभागाला लेखी निवेदन…

ठाणे विभागातील आश्रम शाळा मधील शिक्षण सेवकाना नियमित वेतनश्रेणी मंजुरीसाठी शिक्षक भारतीकडून दखल : आदिवासी विकास विभागाला लेखी निवेदन..

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या शासकीय व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळामधील सहाय्यक शिक्षकांचा तीन वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण होऊनही त्यांना देय ठरणारी नियमित वेतनश्रेणी प्राप्त होत नसल्याबद्दल शिक्षक भारती संघटनेने तात्काळ दखल घेऊन आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे.
याबाबत शिक्षक भारतीच्या माध्यमातून लक्ष वेधल्यानंतर शिक्षक आमदार आमदार कपिल पाटील यांनी आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे सूचना केली आहे.
याबाबत आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबतच्या वृत्तानुसार ठाणे विभागाच्या कार्यक्षेत्रात आश्रम शाळामध्ये सहाय्यक शिक्षक हे परीविक्षाधीन तीन वर्षांच्या कालावधीसाठी ठराविक मानधनावर नियुक्त करण्यात आले आहेत.

सदर शिक्षण सेवकांचा मानधनावरील तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यानंतर याबाबत सर्व शिक्षकांचा नियमित वेतनश्रेणीच्या विहित प्रस्ताव आवश्यक मंजुरीसाठी आदिवासी विकास ठाणे विभागाच्या अप्पर आयुक्त यांच्या कार्यालयाकडे सादर केला जातो.
विहित तरतुदीनुसार अशा प्रकारचे सुमारे 100 हून अधिक प्रस्ताव कार्यालयाकडे दाखल झाले असल्याची माहिती मिळते.
शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष आणि कोकण शिक्षक मतदारसंघातील उमेदवार धनाजी पाटील यांनी ठाणे व पालघर जिल्ह्यातील विविध आश्रमशाळांच्या शिक्षकांशी संपर्क साधला असता सदरची बाब प्रकर्षाने ध्यानी आली. यातुन या शिक्षकांचे होणारे आर्थिक नुकसान व ताणतणाव लक्षात घेऊन, याबाबत त्वरित लक्ष घालण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
त्यानुसार शिक्षक भारतीच्या वतीने धनाजी पाटील यांनी सदर समस्या शिक्षकांचे नेते व शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या निदर्शनास आणून लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली.
या प्रकरणी शेकडो शिक्षक केवळ मंजुरीच्या प्रतीक्षेत असून त्यामुळे मानधन आणि वेतनश्रेणी नियमित वेतनश्रेणीशिवाय अक्षरशः अनेक महिने बिनपगारी काम करत असल्याची धक्कादायक बाब विचारात घेण्यात आली आहे.
यावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी ही त्वरेने या समस्येची दखल घेऊन या विलंबामुळे होणारे आर्थिक नुकसान आणि ताणतणाव याबाबत आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त ठाणे यांना लेखी पत्र देऊन तात्काळ याबाबत कार्यवाही करण्यासाठी सूचना केली आहे.
याद्वारे या शिक्षकांच्या नियमित वेतनाच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्याबाबतची सूचना केली आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील ठाणे पालघर जिल्ह्यातील शेकडो शिक्षक अनेक महिन्यापासून मानधन आणि नियमित वेतन वेतनापासून वंचित राहिलेल्या शिक्षकांना न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.

दरम्यान शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष व कोकण शिक्षक मतदारसंघातील उमेदवार धनाजी पाटील यांनी या प्रकरणी अतिशय तत्परतेने त्वरेने दखल घेऊन या शिक्षकांवरील होणारा अन्याय दूर करण्यासाठी पावले उचलल्याबद्दल आश्रम शाळा विभागातील शिक्षकाकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
सदर प्रकरणी शिक्षक भारती पालघरचे जिल्हाध्यक्ष अनिल शेलार, जिल्हा कार्यवाह रवींद्र पिंपळे, जिल्हा उपाध्यक्ष व आश्रमशाळा विभागाचे प्रमुख प्रा.प्रकाश जाधवर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. झुंबर ढाकणे, जिल्हा संघटक प्रा. किरण थोरात, डहाणू प्रकल्प प्रमुख रवींद्र बंडगर इ सह अनेक जेष्ठ पदाधिकारी यांनी लक्ष घातल्याबद्दल आश्रमशाळेतील शिक्षकांनी आनंद व्यक्त करून धन्यवाद दिले आहेत.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर