
हिंगणघाट मधील दिग्गजांसोबत नवोदित साहित्यिक कवींनी गाजविली तालुकास्तरीय काव्य स्पर्धा…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )वर्धा :- प्रा.दिनेश राठोड
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील नवकवी व साहित्यिकांना हक्काचा मंच मिळावा आणि हिंगणघाट मध्ये दिग्गज साहित्तिकांबरोबरच नवीन साहित्यिकांनासुद्धा साहित्याच्या क्षेत्रात हिंगणघाट चे नाव मोठे करता यावे या हेतूने सदर स्पर्धेचे आयोजन अतुलभाऊ वांदिले मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले. प्रसंगी हिंगणघाट येथील अगदी शाळेतील विद्यार्थ्यांपासून तर प्राचार्यापर्यंत एकूण पंचवीस साहित्यिक कवींनी या स्पर्धेत सहभागी होऊन रंगत आणली. विशेष म्हणजे तब्बल तीन पारितोषिके विद्यार्थ्यांनी आपल्या दर्जेदार कवितांसाठी मिळविली, स्पर्धेला अध्यक्ष म्हणून कवी गिरिधर काचोळे, तर अतिथी म्हणून आधार फाऊंडेशन चे कार्यकारी अध्यक्ष लक्ष्मीकांत धार्मिक, प्रा.डॉ शरद विहीरकर, वासुदेव पडवे, प्रा.गजानन जुमडे तर परीक्षक म्हणून मुगल बेग सर व रसपाल शेंद्रे यांची उपस्थिती होती, स्पर्धेत सर्व कवी व कवयित्री यांनी अनेक ज्वलंत विषयांना हात घातला, परीक्षक मजीदबेग मुगल यांनी कविता सादरीकरण करतांना काय काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले तर रसपाल शेंद्रे यांनी साहित्यक्षेत्रात नवसाहित्तिकानी विषयाला न्याय देताना सामाजिक प्रश्नांना ताकदीने मांडावे असे आवाहन केले, अध्यक्षीय भाषणातून गिरीधरजी काचोळे यांनी कवितेची परंपरा विशद करून त्या परंपरेला जपत काव्यातून समाजाला कशी दिशा देता येईल याबद्दल सर्वांनी विचार करून काव्यानिर्मिती करावी असे मत व्यक्त केले, स्पर्धेत प्रथम सतिश गारघाटे, व्दितीय श्रद्धा पौरकर, तृतीय प्रा.दिनेश राठोड तर प्रोत्साहन पुरस्कार गौरी तेलहांडे, प्रिया उरकुडकर यांनी प्राप्त केला, स्पर्धा समारोप प्रसंगी उपस्थित रसिकापैकी राजश्री विरुळकर, अस्मिता दारुंडे, भाग्यश्री साबळे, संतोषी ढगे, आशिष वरघणे, रंगनाथ तालवटकर, वासुदेव पडवे यांनीही कविता सादरीकरण केले, सोबतच मंचावरील सर्व मान्यवरांनी सुद्धा कविता सादर करून कार्यक्रमात रंगत निर्माण केली.
कार्यक्रमाचे संचालन जगदीश वांदिले यांनी तर प्रास्ताविक प्रा. अभय दांडेकर यांनी केले व आभार गजानन जुमडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरेश गुंडे, सुनिल डांगरे, कु.वैभवी मुळे आणि अतुलभाऊ वांदिले मित्रपरिवार व सर्व कवींनी सहकार्य केले
Total Users : 10828