ji24news

एस.टी.बसेसची संख्या कमी प्रवाशी बेहाल…

एस.टी.बसेसची संख्या कमी प्रवाशी बेहाल..

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )वर्धा :  – प्रा.दिनेश राठोड.
महामंडळाने हिंगणघाट आगाराला गेल्या अनेक वर्षांपासून एकही नवी लालपरी (एसटी) दिली नाही.त्यातच ज्या जुन्या बसेस होत्या, त्यापैकी ४ बसेस कुचकामी असल्याने धूळखात पडून आहेत. अनेक बस गाड्यांना १० ते १२ वर्षे झाली आहेत. त्यांनाही आता ‘ब्रेकडाऊन’ची घरघर लागल्याने त्या कशाबशा खडखड आवाज करत धावत आहेत.आगारात असलेल्या ४३ पैकी ४ ते ५ बसेसची स्थिती वाईट आहे.त्या कधी दम सोडतील याचा नेम नाही. सुरक्षित प्रवासाच्या नावावर एसटी महामंडळ भाडेवाढ करत असले तरी प्रवाशांच्या
आरामाबाबत मात्र गंभीर नाही. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजाने धक्के खात प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी वैतागले आहेत, अनेक कर्मचारी,ग्रामीण भागातील प्रवाशी विद्यार्थी यांना दररोज कामासाठी व शाळेसाठी एसटीने प्रवास करावा लागतो. कधी-कधी एसटी बस नादुरुस्त असते. यावेळी इंजिनमधून आवाज येतो.बस मधेच बंद पडते, त्यामुळे प्रवासात खूप त्रास होतो.
एसटी महामंडळाने नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात.
– नमित हस्ते,सचिन महाजन प्रवासी (पिपरी)
५० नवीन बसेसची मागणी
वारंवार शासनाकडे व वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे आगारात सद्या त्यापैकी ४३ बसेस आहेत पैकी ४ ते ५ नादुरुस्त आहेत तर काहींचे इंजिन खराब झाले आहे.आम्ही ४० ते ५० नव्या बसेसची मागणी केली आहे.- नेवारे साहेब आगार व्यवस्थापक, हिंगणघाट
मागील काही वर्षात अनेक एसटी बसेसचे आयुष्य संपले. त्यामुळे त्या भंगार झाल्या होत्या त्या बसेसचे स्पेअर पार्ट बंद पडलेल्या बसेस मध्ये बसवून जास्तीत जास्त बसेस चालू स्थितीत ठेवण्याचे प्रयत्न आगार प्रमुख करत आहेत. बस फेऱ्यांचे नियोजन करतांना अमाप अडचणीचा सामना करावा लागत आहे पहाटे आगारातून निघालेली बस रात्री सर्व फेऱ्या मारून उभी राहते दिवसभर चालल्याने त्या बसचे इंजिनचे टेम्प्रेचर वाढून बिघाड होत आहेत.पण बसची संख्याच कमी असल्यामुळे त्यावर उपाय नाही. त्यानंतरही महामंडळाने एकही नवी बस दिली नाही.हव्या असलेल्या संख्येपेक्षाही ५० टक्के बसेसच्या भरवशावर काम भागवले जात आहे.आणि आगार प्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागत आहे,विशेष म्हणजे आगार व्यवस्थापक श्री नेवारे साहेब हे जोपर्यंत बसस्टँड वरील शेवटचा प्रवाशी विद्यार्थी असो वा ग्रामीण भागातील ये जा करणारे लोकं हे त्याच्या गावी जात नाही तोपर्यंत बसस्टँड वर प्रवाशांजवळ जाऊन जातीने चौकशी करून त्यांचा जवळ उभे राहतात व बसेस च्या फेऱ्यांचे नियोजन करतात,त्यांच्या समस्या सोडवितात हि बाब उल्लेखनीय आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर