ji24news

शिक्षक भारतीचा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेण्यासाठी संपर्क दौरा….

शिक्षक भारतीचा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेण्यासाठी संपर्क दौरा…

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )वर्धा : प्रा.दिनेश राठोड

शिक्षक भारती तर्फे दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी शाळा तिथे भेट हा कार्यक्रम राबविण्यात आला,हिंगणघाट तालुक्यातील विकास विद्यालय सिरसगाव,शाहू महाराज आश्रम शाळा, इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय
नि.मु.घटवाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विकास विद्यालय व कनिष्ठ महा. वडनेर, साईबाबा वरीष्ठ महाविद्यालय वडनेर, विकास विद्यालय पोहणा, येरलेकर विद्यालय येरला, बालाजी विद्यालय टेम्भा, लोकमान्य विद्यालय दारोडा, महात्मा गांधी विद्यालय कुटकी, संजय गांधी विद्यालय वणी येथे शिक्षक भारतीच्या पदाधिकार्यानी यांनी भेटी दिल्यात,
दरम्यान नी मु घटवाई विद्यालय,वडणेर येथे श्री कमलाकर झाडे यांनी शिक्षक भारतीची,कार्यपद्धती,शिक्षक
शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका,रात्रशाळा कर्मचारी,
वस्ती शाळा कर्मचारी,
आश्रमशाळा कर्मचारी, महिला कर्मचारी यांच्या समस्यांची सोडवण्यासाठी शिक्षक भारतीने केलेले प्रयत्न याविषयी माहिती दिली, तसेच श्री नौकरकर सर यांनी इंदिरा गांधी वडनेर येथे माहिती देऊन शिक्षक भारतीकडे आपल्या समस्या मांडण्याकरिता आवाहन केले.याप्रसंगी शाहू महाराज आश्रमशाळा येथे
श्री रेणुदास नागतोडे यांनी आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची अनियमितते विषयी समस्या मांडल्या ,अविनाश कापसे पोहणा ढगेसर मुख्याध्यापक टेम्भा,श्री शेंडगे सर, मुख्याध्यापक वडनेर, ढगे सर कुटकी, श्री महल्ले सर मुख्याध्यापक येरला,यांनी आपल्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या सहकार् तसेच व्ही.सी खैरे मॅडम मुख्याध्यापिका इंदिरा गांधी विद्यालय वडनेर व प्राचार्य श्री सातपुते सर, नि. मु. घटवाई श्री शेंडगे सर मुख्याध्यापक विकास विद्यालय वडणेर यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी शिक्षक भारतीने पाठपुरावा करावा अशी विंनती केली सर्व पदाधिकारी यांनी आपल्या सर्व मागण्या व समस्यांचा पाठपुरावा आम्ही शिक्षक आमदार श्री कपिल पाटील साहेब यांच्याकडे विनाविलंब करू व हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात आपल्या मागण्या मान्य करायला लावू असे आश्वासन दिले,या दौऱ्यात जेष्ठ शिक्षक श्री नौकरकर सर, श्री कमलाकर झाडे, श्री विलास बेले,प्रा.श्री दिनेश राठोड, श्री नरेश येडे, शशिकांत कुरसंगे,प्रा.श्री अतुल वडमलवार आदी पदाधिकारी होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर