ji24news

पालघर जिल्हातील विक्रमगड तालुक्यामधील तळ्याचापाडा (वेहेलपाडा) गावामधील कु. उत्तम शिवराम केंझरा याची रग्बी खेळात राष्ट्रीय स्तरावर निवड . .

पालघर जिल्हातील विक्रमगड तालुक्यामधील तळ्याचापाडा (वेहेलपाडा) गावामधील कु. उत्तम शिवराम केंझरा याची रग्बी खेळात राष्ट्रीय स्तरावर निवड . .

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )विक्रमगड – (प्रशांत दाव्हाड)
विक्रमगड – पालघर जिल्ह्यामधील विक्रमगड तालुक्यातील गाव वेहेलपाडा (तळ्याचापाडा) कुमार उत्तम शिवराम केंझरा हा मुलगा येथील रहवासी असून, त्यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मावली माऊली चा कृपा आशीर्वादाने व संस्थेच्या वतीने अध्यक्ष आदरणीय मा. नंदकुमार सुर्यवंशी साहेब व सर्व ट्रश्ट् मंडळ, यांच्या मार्गदर्शनातून आत्मावलींचे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात राज्य तथा राष्ट्रीय स्तरावर बाजी मारताहेत निवडले जाताहेत यातच शासनाच्या नामांकित योजने अंतर्गत आत्मरुप या विभागाने शिक्षण घेणाऱ्या उत्तम शिवराम केंझरा या विद्यार्थ्यांची नॅशनल साठी निवड झाली आहे.
रग्बी इंडिया गुजरात रग्बी यांच्या संयुक्त विद्यामानाने २१/१२/२०२२ ते २२/१२/२०२२ रोजी या दरम्यान अहमदाबाद आय आय टी आय गांधीनगर गुजरात या ठिकाणी रग्बी खेळाची राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत.
नंदुरबार या ठिकाणी झालेल्या सराव शिबिर चाचणीतून उत्तम केंझरा हा महाराष्ट्र राज्याच्या संघाकडून खेळणार आहे. दिनांक २६/११/२०२२ ते २७/२०२२ रोजी रायगड या ठिकाणी राज्य स्तरीय स्पर्धा पार पडल्या त्यातून आत्मा मलिक ध्यान पीठ शिर्डी यातून उत्तम केंझरा व कल्पेश देशमुख या दोन विद्यार्थ्यांचा समावेश होता.
मात्र नंदुरबार या ठिकाणी झालेल्या नॅशनल कॅंप मधून उत्तम शिवराम केन्झरा याची नॅशनल साठी निवड करण्यात आली.
या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. सुनिल चौधरी सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यशवंत खेळाडूंचे परपुज्य सद्गुरू आत्मावली माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय नंदकुमारजी सुर्यवंशी साहेब सर्व ट्रश्ट मंडळ तसेच संकुलाचे व्यवस्थापक सुधाकर जी मलिक सर क्रीडा विभाग प्रमुख एम. पी. शर्मा सर व सर्व क्रीडा शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. आणि जिल्ह्यातून व तालुक्यातून तसेच गावातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर