ji24news

विक्रमगड आदिवासी ग्रामीण भागात युवा शेतकऱ्याची शाश्वत शेतीकडे वाटचाल…
कृषी पदवीधर तरुण युवा शेतकऱ्याची यशोगाथा……


विक्रमगड आदिवासी ग्रामीण भागात युवा शेतकऱ्याची शाश्वत शेतीकडे वाटचाल…
कृषी पदवीधर तरुण युवा शेतकऱ्याची यशोगाथा……

          जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) दीपक भोये
निसर्गाचा लहरीपणा शेतमालाचा अनिश्चित दर, मंजुरांची कमतरता, महागडे बियाणे व खते अशा अनेक संकटांमुळे शेतकरी अक्षरशः होरपळून निघत आहे. तरुणांनी शेतीकडे आता सपशेल पाठ फिरविली आहे. असे असताना सुद्धा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर शेती क्षेत्रात प्रकाशमान वाटा तयार करणारे तरुण दुर्मिळ झाले आहेत. विक्रमगड तालुक्यातील एका उच्चशिक्षित तरुणाने शेतीमध्ये ड्रॅगन फ्रुट मत्स्य शेती व त्याच्यासोबत भाजीपाला लागवड करून त्यामध्ये कमालीचे यश संपादन केले आहे.
विक्रमगड तालुक्यातील वांगणपाडा येथील युवा शेतकरी सुरज हरिश्चंद्र कुरकुटे (पदवीधर) यांनी 2016 मध्ये कृषी क्षेत्रात पदवी प्राप्त केली. कृषी क्षेत्रात पदवी प्राप्त होऊन त्यानंतर सलग दोन वर्षे नोकरीसाठी प्रयत्न केले.मात्र तरीसुध्दा त्यांना नोकरी मिळाली नाही. त्यानंतर मात्र योग्य वेळी त्यांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीत करिअर करण्याचा प्रयत्न केला. आपल्या कुटुंबीयांच्या माध्यमातून मोगरा लागवड करण्याचे ठरवले. शेतीत नवनवीन प्रयोग करण्याच्या तळमळीने 2019 साली सुरजने पाऊण एकर क्षेत्रात पुण्याहून आणलेले 600 ड्रॅगन फ्रुटची लागवड केली.
सुरजला यासाठी दीड लाख रुपये खर्च आला असून जून ते सप्टेंबर या महिन्यात येणाऱ्या फळांवर तो पुढे पंधरा वर्षे उत्पन्न घेणार आहे. ड्रॅगन फ्रुट ला सेंद्रिय खताची आवश्यकता असते. तसेच तुलनेत पाणी कमी लागते. चांगल्या दर्जाच्या फळांसाठी सुरज प्रयत्न करणार आहे. विक्रमगड तालुक्यातील कृषी विभागाकडून भक्कम पाठबळ व मार्गदर्शन मिळत असल्याने त्याने आता आंबा व काजू अशा फळांची लागवड सुध्दा केली आहे.
विक्रमगडसारख्या ग्रामीण आदिवासी भागामध्ये आधुनिक शेतीमुळे मंजुरांसह अनेक समस्यांवर मात करून गट शेतीचा विकास करून त्यामध्ये शेतकरी सहभागी झाल्यास मालाच्या विक्रीचा प्रश्न उत्तमरित्या निकाली लागू शकतो. यामुळे बाहेर पालघर, ठाणे भिवंडी या ठिकाणी रोजगारासाठी स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही .
“येत्या काळात कोलंबी व खेकडे पालन यासारखे प्रयोग करण्याचा मानस आहे”- सुरज हरिश्चंद्र कुरकुटे (कृषी पदवीधर) शेतकरी.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर