ji24news

पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष – श्री.प्रकाशजी निकम यांच्या सौजन्याने मोखाड्यात पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन…

पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष – श्री.प्रकाशजी निकम यांच्या सौजन्याने मोखाड्यात पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन…

जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी मोखाडा.

मोखाडा – जव्हार तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक तरुण सध्या पोलीस भरतीची अतिशय परिश्रमपूर्वक तयारी करत आहेत. मात्र त्यांना योग्य व गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे या तालुक्यातून पोलीस भारतीत यशस्वी होणाऱ्या तरुणांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच असते. मोखाडा – जव्हार तालुक्यातील दुर्गम आदिवासी तालुक्यातील तरुणांचा पोलीस भरतील टक्का वाढवण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष – श्री.प्रकाशजी निकम साहेब ( राज्यमंत्री दर्जा ) यांनी पालघर जिल्हा पोलीस जनसंवाद अभियान – 2022 कार्यक्रमांतर्गत पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मोखाडा या ठिकाणी करण्यात आलेले आहे.
सदर पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिरात तरुणांना पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक – श्री. बाळासाहेब पाटील व मोखाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक – श्री. संजयकुमार ब्राह्मणे साहेब मार्गदर्शन करणार आहेत. पोलीस भरती करणाऱ्या तरुणांना दिनांक – 28 डिसेंबर 2022 रोजी ग्राउंड व मार्गदर्शन – काजूचा माळ मोखाडा या ठिकाणी सकाळी नऊ वाजता करण्यात येणार असून प्रशिक्षण व व्याख्यान – साई मंदिर हॉल मोखाडा वेळ दुपारी बारा वाजता करण्यात येणार आहे. या शिबिरात मैदानी चाचणी यशस्वी कशी करावी ? याबरोबरच लेखी परीक्षेतील सामान्य ज्ञानाबरोबरच बुद्धिमत्ता,गणित इ.विषयांवरील प्रश्न कसे सोडवावेत या संबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन शिबिरामध्ये मोखाडा व जव्हार तालुक्यातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेण्यात यावा अशा प्रकारचे आवाहन पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष – श्री. प्रकाशजी निकम साहेब ( राज्यमंत्री दर्जा ), पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक – श्री.बाळासाहेब पाटील साहेब व मोखाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक – श्री.संजयकुमार ब्राह्मणे साहेब यांनी केलेले आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर