ji24news

आदिवासी विकास विभागातील कंत्राटी संगणक – क्रीडा – कला शिक्षकांना सेवा सातत्य व शासकीय सेवेत समायोजन करावे यासह विविध मागण्यासाठी कंत्राटी संगणक – क्रीडा – कला शिक्षक कृती समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चा…

आदिवासी विकास विभागातील कंत्राटी संगणक – क्रीडा – कला शिक्षकांना सेवा सातत्य व शासकीय सेवेत समायोजन करावे यासह विविध मागण्यासाठी कंत्राटी संगणक – क्रीडा – कला शिक्षक कृती समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चा…

विक्रमगड – आदिवासी विकास विभागातील कंत्राटी संगणक – क्रीडा – कला शिक्षकांना सेवा सातत्य व शासकीय सेवेत समायोजन करावे यासह विविध मागण्यासाठी कंत्राटी संगणक – क्रीडा – कला शिक्षक कृती समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला.
हे शिक्षक आपल्या आश्रमशाळेत कला, क्रीडा, संगणक मिळून जवळ पास दीड हजार (१५००) कंत्राटी शिक्षक मागील चार वर्षे कार्यरत आहेत. तरी सुद्धा या शिक्षकांना वेळेवर पगार होत नसताना देखील आपली जबाबदारी पूर्णपणे केलेली आहे.
त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार करून शाळाबाह्य कामेही केली गेली.
२८/१२/२०२२ रोजी आपल्या विविध मागण्या घेऊन कला,क्रीडा,संगणक शिक्षकांनी यशवंत स्टडियम हातोडी येथून आंदोलनाला सुरुवात केली आहे.मागील 4-5 वर्षापासून आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांमध्ये सेवा देत असलेले हे शिक्षक सरळसेवा परीक्षा देऊन भरती प्रक्रिया निवड होऊन सेवेत रुजू झाले आहेत परंतु शासनाने 11 महिने सलग आदेश न देता कधी प्रथम सत्र तर कधी द्वितीय सत्र,तर कधी 2 महिन्यासाठी ,4 महिन्यासाठी अश्या प्रकारे आदेश दिले. कोरोना काळामध्ये शाळा सुरू असताना कला,क्रीडा,संगणक शिक्षकांनी सेवा दिली परंतु शासनाने या शिक्षकांवर दुर्लक्ष करत सेवेत सतत खंड पडला.शाळेतील व शाळेबाहेरील कामे जसे खावटी ची कामे,प्रकल्पस्तरिय विविध होणार कार्यक्रम जसे कातकरी महोत्सव,प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा,नवीन इमारत शाळा रंगरंगोटीची कामे,अध्ययन स्तरामधील माहिती संकलन अश्या प्रत्येक प्रकल्प कार्यालयाने राबविलेल्या कार्यक्रमांमध्ये दिलेली कामे या शिक्षकांकडून करून घेतली परंतु पगार कधी वेळेवर दिला नाही.
आताही सहा ते सात महिन्यापासून चा पगार हा विभागाला निधी नसल्याच्या कारणाने भेटला नाही तरीही इमान इतबारे सेवा देणाऱ्या कला,क्रीडा,संगणक शिक्षकांना बाह्यस्त्रोताद्वारे भरती करून सेवा घेण्याचा घाट शासनाने घातलेला आहे. तरी सर्व महाराष्ट्रातील कला,क्रीडा,संगणक हे शासनाकडे सेवा सातत्याची मागणी करत असून बाह्यस्त्रोत ही आधुनिक गुलामगिरी आहे तरी विद्यार्थी शिक्षणात सरकारी कंत्राटी मानधन तासिका,रोजंदारी असे प्रकार करून शासन कर्मचाऱ्यांत तफावत करत असून दूरगामी दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार असून आदिवासी विकास विभागातील हे ग्रामीण तसेच पेसा क्षेत्रातील आहेत त्यामुळे हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे तरी पुढील काही दिवसांनी होणाऱ्या आदिवासी विभागातील भरती प्रक्रियेत बाह्यस्रोत कंत्राटी न भरता संगणक,कला,क्रीडा शिक्षकांचे समायोजन करावे व मागील काम करत असलेल्या शिक्षकांचा अनुभव लक्षात घेऊन उत्तम विद्यार्थी घडविण्यासाठी या शिक्षकांना संधी मिळावी हीच मागणी कला,क्रीडा,संगणक शिकाकांद्वारे करण्यात आली.
आणि म्हणून मोर्चात सहभागी कंत्राटी शिक्षकांनी आपल्या मागण्यासाठी जोरदार नारेबाजी करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. मोर्चातील शिष्टमंडळाने आदिवासी विकास मंत्री विजय गावित यांना निवेदन सादर केले.मंत्री महोदयांनी निवेदनातील मागण्यांवर सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर