
मुलींनी आत्मसंरक्षणाबाबत सजग रहावे व होणाऱ्या अत्याचारापासून स्वसंरक्षण करावे याबाबत श्री मेघाली गावंडे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शन…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा.दिनेश राठोड- वर्धा.
दि 26 डिसेंबर 2022 रोजी “दक्ष नागरिक फाउंडेशन पोलीस मित्र वर्धा जिल्हा”तर्फे
विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाबाबत सजग रहावे व होणाऱ्या अत्याचारापासून संरक्षण कसे करावे याकरिता श्रीमती मेघाली गावंडे मॅडम पोलीस निरीक्षक दामिनी पथक वर्धा यांनी
हिंगणघाट येथील मातोश्री आशाताई कुणावर कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयाचा हिंगणघाट नजीक आजंती या गावात ‘राष्ट्रीय सेवा योजना कॅम्प’ आयोजित केला होता या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनिना जिल्ह्यातील पोलीस विभागातर्फे गुन्हेगारी संबंधी जनजागृती करण्याच्या निमित्त्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उमेश तुळसकर व कार्यक्रमाचे अधिकारी अभय दांडेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
याप्रसंगी देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे याला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाय योजना करता येईल याबाबद्दलचे समुपदेशन करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला होता,या कार्यक्रमाला
मा. प्रकाश खंडार (अध्यक्ष)
दक्ष नागरिक फाउंडेशन पोलीस मित्र वर्धा जिल्हा मा.प्रशांत कोसुरकर जिल्हा संघटक वर्धा
मा. प्रशिल दाबेकर, श्रीमती मेघाली गावंडे मॅडम हिंगणघाट पोलीस निरीक्षक तथा दामिनी पथक वर्धा) हे उपस्थित होते, श्रीमती मेघाली गावंडे मॅडम यांनी मुलींना आत्मसंरक्षण वाढते गुन्हेगारी मुलींवर होणाऱ्या अत्याचार मोबाईल गुन्हेगारी दुष्परिणाम सायबर गुन्हेगारी यापासून वेळीच मुलींना सावधान रहावे म्हणजेच विद्यार्थ्यांवर वाईट प्रसंग अत्याचार गुन्हेगारी प्रवृत्ती रोखता येईल,तसेच प्रकाशजी खंडार साहेब यांनी वर्धा जिल्हा शांत व गुन्हेगारी मुक्त जिल्हा म्हणून ओळखला जाईल याकरिता आपल्या सर्वांचे सहकार्याची गरज आहे असे म्हंटले व पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात केले, कॅम्पचे कार्यक्रम अधिकारी दांडेकर सर यांनी विद्यार्थिनींना मोबाईल पासून दूर राहून आपले ध्येय व उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करावी असे सांगितले. जिल्हा संघटक प्रशांत कोसुरकर यांनी विद्यार्थ्यांना कसे आत्मसंरक्षण करायचे आहे या विषयावर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनीने केले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी मोलाचे सहकार्य केले,
Total Users : 10829