
इंडियन टेक्निकल इन्स्टिट्यूट,वडनेर येथे दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान……
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा.दिनेश राठोडवर्धा.
दिनांक 29/12/2022 रोजी DAY-NULM अंतर्गत सुरू असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे उद्घाटन व कौशल्य प्रशिक्षण संदर्भात मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते, या प्रसंगी इंडियन टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे( day nulm) अंतर्गत प्रशिक्षणाची सुरवात करण्यात आली. यावेळी नगर परिषद हिंगणघाट येथील मा. मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी श्री देवेंद्र सोरटे सर ,भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हा (अनुसूचित जाती जमाती )महामंत्री अतुलजी नंदागवली सर, सॉफ्टलाइन कम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक श्री अमोलजी बिडकर सर,साई अँब्रेसिया कम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक श्री चंद्रकांतजी ननंतकर सर,साई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष लोकेशजी राडे सर,सचिव वैभवजी गलांडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला,याप्रसंगी वैभवजी गलांडे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रकल्प अधिकारी सोरटे सर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षन जीवनात कशाप्रकारे महत्त्वाचे आहे त्यामुळे जीवनमानाचा स्तर कसा उंचावेल,हे प्रशिक्षण घेतल्या नंतर स्वयंम रोजगार उभा करून जीवनमानाचा स्तर कसा उंचावेल असे मोलाचे मार्गदर्शन केले .दत्ताजी कोसुरकर सर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर पंकज कलवडे सर यांनी आभार प्रदर्शन केले ,यावेळी झोडे सर,धनवीज सर,सुरज काळे ,महेश डाखोरे व सर्व प्रशिक्षण घेणारे विध्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते
Total Users : 10829