
चिमूर सेवन सिस्टर येथे युवा प्रेरणा विद्यार्थीसेवा संस्थेची अभ्यास सहल..
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ‘-प्रा.दिनेश राठोड -वर्धा
वर्धा जिल्ह्यातील,वडणेर येथील युवा प्रेरणा विद्यार्थीसेवा संस्था व नेहरू युवा केंद्र,वर्धा युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आर. टी. आय कॉम्पुटर अँड टेकनिकल इन्स्टिटयूट वडनेरची एक दिवसशीय अभ्यास सहल चिमूर येथे पर्यटन व परिसर अभ्यास करिता नेण्यात आली.पाठ्ठपुस्तकांच्या सोबत व्यावहारिक ज्ञान, निसर्ग आणि समजभिमुख अभ्यास जास्त महत्वाचा असतो. म्हूणन युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थेचे अध्यक्ष राहुल दुरतकर व झेप सोसियल अँड एज्यूकेशन संस्थेचे अध्यक्ष संदीप सुपटकर यांच्या मार्गदर्शना खाली व माहिती व जनसंपर्क प्रतिनिधी सचिन महाजन राखी जाधव (शिक्षिका) वडणेर,टेम्बाचिकमोह,शिरसगाव गांगापुर,भिवापूर,पिपरी,जागोना, वेणी व पोहना येथील 30 विद्यार्थ्यासह अभ्यास सहलीकरिता चिमूर येथील सेवन सिस्टीर या स्थळाची निवड करण्यात आली व त्या ठिकाणी जाऊन विविध वृक्ष झाडे व गोल आकाराचे जुने दगड,फळांची झाडे,व त्या निसर्गरम्य सौंदर्य परिसरातील 2 कीलोमीटर पर्यन्त पहाडाचे निरीक्षण विद्यार्थ्यांनी केले,अनेक पक्षांचा किलबिलाट त्यांनी ऐकला,दिवसभर अभ्यास व निरीक्षण केले,
Total Users : 10829