
वेणी सावित्रीबाई फुले जयंती साजरी…..
वर्धा प्रतिनिधी : प्रा.दिनेश राठोड
भारतीय स्त्रियांना शिक्षणाची दरवाजे खुली करून देणाऱ्या तसेच भारतीय शिक्षणाची ज्ञानगंगोत्री क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती वेणी येथील महिला मंडळानी दिनांक 3 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी वेणी गावाचे सरपंच श्री. अमोल दुरतकर, प्रमुख मार्गदर्श म्हणून पोलीस पाटील श्री. सुभाष उगे, तसेच प्रमुख उपस्थिती वेणी चे माझी सरपंच श्री. मधुकर लोणबळे, श्री. गणपत मोहर्ले, गुरुदेव सेवक श्री.प्रदीप पडवे, श्री. नरेश गंगापारी आदी चीउपस्तिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर गावातून रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी भाषानातून
सावित्रीबाई यांच्या आयुष्यातील अनेक सामाजिक व शैक्षणिक विषयावर प्रकाश टाकत त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन भाषण करताना सावित्रीबाई फुले यांच्यामुळे सर्व महिलांना चौकटीबद्ध व्यवस्थेतून बाहेर पडता आले. त्यामुळे आज भारतीय महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर दिसून येत असून आधुनिक स्त्री व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची तुलनात्मक अभ्यास व गरज असल्याचे श्री. नरेश गंगापारी यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी सावित्रीबाई फुले जयंती साजरी चिमुकल्यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा साकारून कार्यक्रमात भर घालत सर्वांना आकर्षित केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. प्रिया शेंडे, बेबी शेंडे, रूपा शेंडे, सोनू शेंडे, सुघंदा लोंनबळे, संगीता लोंनबळे, वंदना लोंनबळे गीता लोंनबळे, भाग्यश्री लोंनबळे कलावती राऊत, सुषमा लोंनबळे, सविता राऊत, वंदना मोहर्ले, इंदू मोहर्ले,शोभा मोहर्ले, अल्का गंगापारी व समस्त गावकरी यांनी सहकार्य केले
Total Users : 10829