ji24news

अवकाळी पाऊस व धुक्यांमुळे पिकांवर ‘अवकाळी’ संकट; २० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता!

अवकाळी पाऊस व धुक्यांमुळे पिकांवर ‘अवकाळी’ संकट; २० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा.दिनेश राठोड -वर्धा.

दाट धुके, ढगाळ वातावरण, उतरलेला पारा आणि काही भागात काेसळलेल्या अवकाळी पावसाच्या सरीमुळे विदर्भातील सर्वच रब्बी पिकांसाेबत कपाशी, तुरी आणि भाजीपाल्याच्या पिकांचे १८ ते २० टक्के नुकसान हाेणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.किडींचा प्रादुर्भाव व जमिनीचे तापमान कमी हाेऊन पिकांमध्ये आंतरिक बदल हाेत असल्याने नुकसान हाेते, असेही त्यांनी सांगितले.
धुके व थंडीची तीव्रता विदर्भात सर्वाधिक असून, तुलनेत मराठवाडा, खानदेश, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात कमी असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या वातावरणाचा गहू, हरभरा, मका, वाटाणा यासह इतर रब्बी तर कपाशी, तूर या खरीप व भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान हाेत आहे. वर्धा व अमरावती जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी काेसळल्या असून, नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यातील काही भागात कडाक्याच्या थंडीमुळे तूर व कपाशीच्या पिकांचे फार मोठे नुकसान झालेबआहे.
धुक्यामुळे पिकांवर किडींसाेबतच बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट हाेणार असल्याने शेतकऱ्यांनी याेग्य उपाययाेजना करायला हव्या, अशी माहिती डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली.

राेग व किडींचा प्रादुर्भाव
धुक्यामुळे तुरीवर शेंगा पाेखरणाऱ्या तर हरभऱ्यावर घाटेअळीचा तसेच गव्हावर तांबेरा या बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव हाेताे. तुरी व हरभऱ्याचा फुलाेर गळताे. गव्हाची पाने पिवळी पडतात. माेसंबीचा अंबिया बहार गळत असून, आंब्याच्या बहारावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव हाेत असल्याने बहार गळताे. संत्र्याचा अंबिया बहार फुटीवर विपरित परिणाम हाेताे, अशी माहिती डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली.

शीतलहरमुळे पीक वाळली
नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील काही भागातील पिकांना शीतलहरीचाही फटका बसला आहे. त्यामुळे कपाशी व तुरीचे पीक वाळले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे जमिनीचे तापमान अचानक कमी हाेऊन पिकांमध्ये अचानक आंतरिक बदल हाेत असल्याने पिकांची वाढ खुंटल्यागत हाेते. त्यामुळे रब्बी पिके पूर्ण वाढ न हाेता अकाली वाळत असल्याने उत्पादनात घट हाेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हाेणार आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर