ji24news

96 व्या अ. भा. मराठी साहित्य संमलेनात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन…..

96 व्या अ. भा. मराठी साहित्य संमलेनात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन….

जोहार इंडिया न्यूज 24 ./प्रा.दिनेश राठोड (प्रतिनिधी वर्धा)
विविध विषयांवरील परिसंवाद… दोन कविसंमेलने…कवी कट्ट्यात 500 कवींच्या कवितांचे सादरीकरण… दिग्गजांच्या प्रकट मुलाखती अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी वर्धा येथे होणारे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे.
संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, कार्यक्रमपत्रिकाही तीन ते चार दिवसांत तयार होणार आहे. संमेलनात 17 ते 18 सत्रे आयोजित करण्यात आली आहेत आणि महात्मा गांधी आणि
विनोबा भावे यांच्या तत्त्वज्ञानाचा आजच्या दृष्टीने विचार, संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचे कार्य… अशा विविध विषयांवर परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियावर केले जाणार असून, घरबसल्या साहित्यप्रेमींना उद्घाटन सत्र पाहता येणार आहे. वर्धा येथे 3 ते 5 फेब-ुवारी दरम्यान साहित्य संमेलन होणार असून, आयोजक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाकडून त्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. साहित्य संमेलनातील कार्यक्रमांविषयीची
चर्चाही साहित्यवर्तुळात सुरू झाली असून, कोणकोणते परिसंवाद होतील, संमेलनात यंदा कोणत्या विषयांवर चर्चा रंगेल, याबाबत साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. संमेलनाच्या कार्यक्रमांविषयीची माहिती विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी दिली.
ते म्हणाले, ‘संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. जगभरातील साहित्यप्रेमींना घरबसल्या हा सोहळा पाहायला मिळणार आहे.संमेलनाच्या ठिकाणी 2 हजार लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. 1 लाख साहित्यप्रेमी संमेलनाला भेट देतील, अशी आशा आहे. संमेलनाची कार्यक्रमपत्रिका तयार होण्यास तीन ते चार दिवस लागणार आहेत.
कार्यक्रमाविषयीची तयारी झालेली असून, ऐनवेळेस काही बदल होऊ शकतात, त्यामुळे सगळे बदल करूनच कार्यक्रमपत्रिका जाहीर केली जाणार आहे.’

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर