
सेवादल काँग्रेसच्या वतीने अल्पोहार चहापानचे वाटप’….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) दीपक भोये.
महाराष्ट्र राज्य ही संताची भुमी या भुमीवर खुप संत होवुन गेले,हजारो-लाखो वारकरी संप्रदाय भक्त पायी दिंडीला जात असतात भिवंडी ग्रामीण व वाडा अंबाडी कुडूस भागातीलही वारकरी पायी दिंडी काढुन खंडेश्वरी नाका मार्गे वाडा शहरातून त्र्येबकेश्वर येथे जात असतात
म्हणून वाडा तालुक्यातील खंडेश्वरी नाका येथून जाणारया वारकरी संप्रदायांना आज वाडा तालुका सेवादल काँग्रेसच्या वतीने संध्याकाळी खंडेश्वरी नाका येथे वारकरी संप्रदाय भक्तांचे स्वागत करुन अल्प आहार व चहापानाची सोय केली त्यावेळेस पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव अनंता वनगा,वाडा तालुका सेवादल अध्यक्ष जगदीश केणे,काँग्रेसचे जेष्ठ नेते संजयजी भानुशाली,दयानंद हरल,लोकेश खत्री,शिक्षक राजेद्र टबाले,अजय कोब वारकरी संप्रदायांच्या सेवेशी उपस्थित होते..

Total Users : 10829