
अंगणवाडीतील बालकांना विविध खेंळणी साहित्याचे वाटप…..
(जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )वर्धा प्रा.दिनेश राठोड.
हिंगणघाट तालुक्यातील पीपरी येथील रहिवासी श्री अंकुश भोयर व श्री रामेश्वर फरकाटे यांच्यामार्फत 75 हजार रुपयांचे खेळणी साहित्य स्थानिक अंगणवाडीला वाटप करण्यात आले तसेच गोल्डन रॉयल फाउंडेशन यांच्या संचालक मंडळाद्रारे तसेच शेरअली लाखानी यांच्या लाईव्ह व्हिडीओ कॉल करून विद्यार्थ्यांना खेळण्यातुन आरोग्य सुदृढ व व्यवस्थित राहावे,यावर मार्गदर्शन करण्यात आले, आपण सगळे एकत्रित येऊन सहकार्य करायला हवे,असे आवाहन अंकुशराव भोयर राहणार पिपरी रामेश्वर फरकाडे यांनी केले, सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून केली ,या कार्यक्रमात गावातील उपस्थित उपसरंपच लीलाधर बरडे ,सरपंच बाई वंदना मडावी , सुरेश घोडे नागपूर पिपरी येथे गोल्डन रॉयल फाउंडेशन तर्फे साहित्य भेट देण्यात आली ,छोट्या सायकली चार तीन चाकी घोडे दहा घोडे एक कासव ,एक ABC चार्ट
तीन बाराखडी चार्ट तीन घोडी लेटर चार्ट इत्यादी ,या कार्यक्रमात अंकुश भोयर व रामेश्वर फरकाटे ,सांगितले की आम्ही त्यासाठी विविध प्रकारची साहित्य वस्तू दिली काही मुलांच्या गरजा लक्षात घेऊन भेट दिल्या मानवता हीच खरी ईश्वर सेवा यासाठी आम्हाला श्री शेरअली भाई लाखानी यांनी प्रोत्साहन दिले यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पिपरी येथे पार पाडला ,रामेश्वर यांचे देखील सहकार्य लाभले छोट्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा असे पिपरी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण खेळ पांडे म्हणाले,या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका लता कुकुर्डे अशोक लेंडे,संगीता खेलपांडे आणि इतर सहाय्यक कर्मचारी अंगणवाडी सेविका व सचिन महाजन उपस्थित होते
Total Users : 10829