
ग्रामपंचायत आकरे मध्ये आज एकुण ८ अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रातील १५० मुलांना कपडे वाटप करण्यात आले.
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत आकरे नवनिर्वचित सरपंच, मा. श्री. धिरज बंडू घुमल व उपसरपंच सौ. ज्याोती गंगाराम खरपडे सदस्य हितेंद्र चिंतामण गिंभल, रमेश बच्चू घुमल, भावना सुरज घुमल, वैशाली अनिल भुरकुड या सर्वांच्या सहकार्याने जवळजवळ १० वर्षातून आकरे ग्रामपंचायत मधील ८ अंगणवाडी केंद्रातील मुलांना ग्राम पंचायत १५ वा वित्त आयोग निधी मधुन ४५००० हजार रुपये खर्च करून १५० कपडे वाटप करण्यात आले. त्यामधे आशा आणि सेविका उपस्थित होत्या. सेविका आणि त्यांच्या अंगणवाडीतील मुलांना खूपच आनंद झाला आहे.
Total Users : 10829