
विक्रमगड पोलिस ठाण्यास थोर महापुरुषांच्या प्रतिमा भेट …..
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये विक्रमगड
दि.१४ जानेवारी २०२३.
विक्रमगड तालुक्यात राष्ट्रीय युवा दिन,राजमाता जिजाऊसाहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या दिमाखात जल्लोषात साजरी झाली.त्यानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत युवकांकडून विविध कार्यक्रम राबविण्यात आले. स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधुन वाकी येथील सामाजिक युवा कार्यकर्ते मिलिंद महाकाळ यांनी विक्रमगड पोलिस ठाण्यास थोर महापुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्या.यासारखे सामाजिक उपक्रम ते समाजात राबवित असतात.खेड्यातील पाणी टंचाईची समस्या त्यावर उपाय म्हणून तरुणांना एकत्र घेऊन श्रमदानाने वनराई बंधारे बांधणे.यासारखे अनोखे उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत मिलिंद महाकाळ ग्रामीण भागात राबवित असतात.हा आजच्या तरुण युवापिढी समोर नवा आदर्श आहे.
राष्ट्रीय युवा दिन व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ यांनी विक्रमगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप गिते साहेब व संपूर्ण पोलिस कर्मचाऱ्यांची टिम यांच्या उपस्थितीत विक्रमगड पोलीस स्टेशन येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जगाला शांततेचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद, जननायक बिरसा मुंडा,भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेले नेताजी सुभाषचंद्र बोस ह्या थोर महापुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्या आहेत .थोर महापुरुषांच्या आदर्श विचारांचा,कार्याचा उजाळा,आठवणींचा वारसा जपण्याचा अनोखा संदेश त्यांनी समाजाला दिला.
त्याप्रसंगी रविंद्र महाकाळ, रोहिदास तुंबडा- सुकसाळे ग्रामपंचायत उपसरपंच,भुषण महाकाळ आदि यावेळी उपस्थित होते.
Total Users : 10829