
श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा…
जोहार इंडिया न्यूज 24 .दिनेश राठोड (वर्धा – जिल्हा प्रतिनिधी)
नजीकच्या हिंगणघाट तालुक्यातील वडणेर येथील साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालय वडनेर येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त
“अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती.” या आठवणीला उजाळा देण्यासाठी ही पाखरे परत एकदा महाविद्यालयाच्या प्रांगणात उतरली. औचित्य होते माजी विद्यार्थी मेळाव्याचे. या मेळाव्याचे उद्घाटन वेणा लोक प्रबोधन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. हेमलताताई गमे यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे संस्थापक सचिव प्रा. दिवाकर गमे, प्राचार्य डॉ. उत्तम पारेकर, सहसचिव अविनाश गमे, उपप्रचार्या डॉ. सारिका चौधरी उपस्थित होते. या मेळाव्यात उपस्थीत असणा-या सर्व माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. उत्तम पारेकर यांनी माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले या पुढेही असेच सहकार्य मिळेल अशी आशा ही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष राहूल दुरतकर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतिच्या वाटचालीचा अभिमान वाटत असल्याचे स्पष्ट केले. माजी विद्यार्थी नेहमी महाविद्यालयाच्या विकासात योगदान देण्यासाठी कटीबद्ध असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी विद्यार्थी विनोद ठाकरे यांनी महाविद्यालयाने शैक्षणीक क्षेत्रातील प्रगती पाहुन आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. माजी विद्यार्थी समितीचे सचिव वैजयंती मांडेकर यानी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, प्रतेकला एक आदर्श असतो तसे आपले महाविद्यालय आदर्श आहे प्रत्येक गोष्टीतून चांगले साध्य करुन आपली प्रगती करुन घ्यावी असे विचार त्यांनी व्यक्त केले. या मेळाव्या निमित्याने जुन्या आठवणींना उजाळा देऊन राजकुमार कोरेवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुकेश मुन, भक्ती घरझोडे, सचिन महाजन इत्यादीनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला माजी विद्यार्थी राहूल दुरतकर, महेश झोटिंग, विनोद ठाकरे, कपिल खंदार, आशिष गारघाटे,सचिन महाजन, राजकुमार कोरेवार, सुषमा कांबळे, नितू गवारकर,निलिमा कोल्हे, शुभम साळवे, अंकित खेकारे, सुरज शंभरकर, रंजित वाघमारे, मयुर भोयर,चंद्रकांत पिपरडे, प्रशांत तिजारे, मोनाली लोहकरे, शाहरूख पठाण, अमोल चहान्दकर, विनय कुम्भलकर, प्रीतम डफ, नितेश सोगे, मेंढे, प्रगती वेले, लंकेश नगराळे, गणेश शेळके, श्री. जारोंडे इत्यादी अनेक माजी विद्यार्थी सभेला उपस्थित होते. सभेचे संचालन व आभार माजी विद्यार्थी समन्वयक प्रा. डॉ. गणेश बहादे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रवीण कारंजकर, डॉ. विनोद मुडे, डॉ. नरेश भोयर, डॉ. विट्ठल घिनमिने, डॉ. पंकज मुन, डॉ. नितेश तेलहांडे, प्रा. संजय दिवेकर, नरेश कातडे, शंकर कापसे, संजय पर्बत, प्रीती सायंकाळ, सुरेश तेलतूंबडे, अरुण तिमांडे, अंकुश वैद्य, विजयालक्ष्मी जरोंडे, सचिन कोळसे,प्रफुल शिंदे, दर्शना शिवरकर, आचल बडवाईक, आचल खिरटकर, रुचीता वेले, चेतन कापसे, हर्षदा महाजन, दिव्याभारती अवचट,रक्षा वाटे, आचल चौधरी, माधुरी डोळासकर, तृप्ती नंधरे, रेशम खिरटकर, तन्नू गवळी, सोनल दोडके, मोनिका उपाध्ये, राधिका गोटेफोडे, यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी उपस्थीत होते.
Total Users : 10829