ji24news

कापसाचे दर वाढणार कधी? बळीराजा करतायेत दरवाढीची अपेक्षा…

कापसाचे दर वाढणार कधी? बळीराजा करतायेत दरवाढीची अपेक्षा…

प्रा दिनेश राठोड (वर्धा प्रतिनिधी) :
सध्या राज्यातील कापूसउत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण कापसाच्या दरात घसरण झाली आहे.कापसाच्या दरात कधी सुधारणा होणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. दर कमी असल्यामुळं अद्याप शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली नाही. कापूस शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवला आहे. सध्या कापसाला सात हजार ते आठ हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे.
कपाशीची लागवड वाढली
कापसाच्या दरात घसरण झाल्यानं वर्धा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. वर्धा जिल्ह्यात कापसाला सध्या सात ते आठ हजार रुपयांचा दर मिळत आहे. मागील वर्षी हाच दर 11 ते 12 हजार रुपयांच्या दर मिळत होता. मात्र, यावर्षी अद्यापही कापसाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी अद्याप कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवला आहे. मागील वर्षी कापशीला मिळालेल्या बाजारभावामुळं शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीची लागवड वाढवली होती. पण अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले. अतिवृष्टी आणि कापाशिवरील रोगामुळे कपाशीच्या उत्पादनात घट आली आहे.
मूलभूत गरजांसाठी पैसा अत्यावश्यक
कपाशीचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अद्याप कापूस बाजारात विक्रीसाठी नेला नाही. तर जिनिंग आणि प्रेसिंग युनिटमध्ये देखील कपाशीची आवक वाढली नसल्याचे चित्र आहे. परंतू शेतकऱ्यांना लागलेला मजुरीचा खर्च, घरात असणारे लग्न समारंभ याशिवाय मुलांचे शिक्षण आणि मूलभूत गरजांसाठी पैसा अत्यावश्यक असतानाही कापूस दर कसा वाढेल याचीच प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.
अतिवृष्टीचा कपाशीला मोठा फटका
अतिवृष्टीमुळं कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. एकरी चार ते पाच क्विंटल असे उत्पादन होण्याची शक्यता आहे. उत्पादनात मोठी घट झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात कपाशीचं उत्पादन घेतलं जाते. मात्र, यावर्षी अतिवृष्टीचा मोठा फटका येथील कापसाला बसला आहे. हाती आलेली पीक अतिवृष्टीमुळं वाया गेली आहे. पुन्हा उरली सुरली पीक परतीच्या पावसामुळं वाया गेली आहेत. या फटक्यातून वाचलेल्या पिकांना देखील योग्य तो दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. कपाशीचे दर कधी वाढमार याची प्रतिक्षा शेतकरी करत आहेत. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील आवाज उठवला होता. मात्र, अद्याप दरात वाढ झाली नाही.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर