ji24news

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत देवदर्शन; ‘एसटी’ महामंडळ लवकरच सुरू करणार नवी सुविधा…

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत देवदर्शन; ‘एसटी’ महामंडळ लवकरच सुरू करणार नवी सुविधा…..
जोहार इंडिया न्यूज 24 )प्रा.दिनेश राठोड (जिल्हा प्रतिनिधी- वर्धा)

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शिंदे-फडणवीस मोठा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ७५ वर्षावरील नागरिकांना राज्य सरकारने एसटीतून मोफत प्रवाससेवा देण्यास सुरू केली. त्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून राज्यभरात मोफत देवदर्शनाची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन करता यावे यासाठी या मेगाप्लॅन आखला जात आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन या मेगाप्लॅनसाठी मुख्यमंत्र्यांना एसटी महामंडळाची साथ लाभणार आहे. राज्यात १ कोटींच्या जवळपास ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. या नागरिकांना देवदर्शन करून आणण्यासाठी तब्बल २ हजार गाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे.

या नवनव्या योजनांचा एसटी महामंडळाला निश्चितच फायदा होणार आहे. सध्या महाराष्ट्रात ६५ वर्षावरील नागरिकांना तिकीच दराक ५० टक्के सवलत मिळते तर ७५ वर्षीय नागरिकांना मोफत प्रवास करता येतो. मात्र आता मोफत देवदर्शनाच्या योजनेत सर्वच ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे.

मोफत देवदर्शन योजना कशी असेल?
मोफत देवदर्शन या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना अष्टविनायक, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, कोल्हापूर, शिर्डी, शेगाव, ज्योतिबा या देवस्थानांना जाता येणार आहे.
केवळ शनिवारी – रविवारी ही सुविधा ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येईल.
स्थानिक डेपोमधून प्रवाशांना या सहलीसाठी नोंदणी करावी लागणार आहे.
राहण्या-खाण्याची व्यवस्था संबंधित देवस्थानामार्फत करण्यात येईल अन्यथा प्रवाशांना स्वत:चा खर्च करावा लागणार आहे. धर्मशाळा, राखीव निवासात खोल्या राखीव ठेवण्यात येणार आहेत. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर