
वर्ध्यात शेतकऱ्याने फुलवली स्ट्रॉबेरीची शेती…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा.दिनेश राठोड (जिल्हा प्रतिनिधी – वर्धा)
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील कात्री गावातील महेश शंकरराव पाटील यांनी तरूण शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. मनात इच्छा असली की माणूस काहीही करू शकतो. विशेष म्हणजे या इच्छेला तंत्रज्ञानाची जोड असली तर,मग काही पाहायलाच नको याचा प्रत्यय वर्धा येथे आला आहे.
या शेतकऱ्याने चक्क स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. वर्धा जिल्ह्यातील वातावरण तसे उष्णच असते. इथल्या वातावरणात एखाद्या गावात स्ट्रॉबेरी पिकेल, असे स्वप्नातही कुणाला वाटल नसेल. पण महेश पाटील यांनी पाऊण एकरात स्ट्रॉबेरी फुलवली आहे. प्रयोग म्हणून त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. आता स्ट्रॉबेरी
शेतात पिकत आहे. स्ट्रॉबेरीचे उत्पादन म्हटले की महाबळेश्वरचे नाव पुढे येते. पण आधुनिक तंत्रज्ञान वापरत इतरही जिल्ह्यात शेतकरी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत आहे. वर्धा जिल्ह्याच्या कात्री येथील तरुण शेतकऱ्यान स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या स्ट्रॉबेरीतून चांगल उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
महेश पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी नोकरी सोडली. सुरुवातीपासून आवड असल्याने शेतीतच वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली. घरी वडिलोपार्जित अठरा एकर शेतीत कापूस, मिरची, चणा, सीताफळ आदी पीक घेतले. महाबळेश्वर येथे असताना त्यांनी स्ट्रॉबेरीची माहिती घेतली आणि शेतात लागवड करण्याचे ठरवले. नोव्हेंबरमध्ये त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवडकेली. त्याकरीता मशागत केली. रोप महाबळेश्वर येथून आणले. स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी ते सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत आहेत. आता स्ट्रॉबेरीची फळे लागली असुन उत्पन्नास सुरूवात झाली आहे. प्रयोग यशस्वी ठरल्यास पुढे स्ट्रॉबेरी लागवडीचे नियोजन राहिल, असे पाटील सांगतात. त्यांना दोन लाख रुपये खर्चाचा अंदाज आहे. चार लाख रुपये उत्पादन होऊ शकेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाआहे.
महेश पाटील यांना शेतीत पत्नीचीही साथ आहे. शेतीतील कमासोबतच शेतमाल विक्रिच्या मार्केटिंगचे काम करताना त्या नवीन संकल्पना राबवतात. स्ट्रॉबेरी विक्रीसाठी त्यांनी सोशल मीडियाचा अवलंब केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. मुलाच्या प्रयोगाचवडिलांनाही विशेष कौतूकआहे. शेतीत वडिलांनीही वेगवेगळे प्रयोग केले. सिड प्लॉट, भाजीपाला पीके घेतली. मुलगाही शेतीत नवीन प्रयोग करत असल्याने वडिलांनीही कौतूक केले आहे. नवीन तंत्रज्ञान, नविन व्हेरियंटचा उपयोग करत वेगळे मार्ग चोखळण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. महेश पाटील यांनीही नवीन पिकाचा प्रयोग केला आहे. प्रयोग किती यशस्वी ठरतो तेही महत्वाचे आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे पुढील उत्पन्न या प्रयोगाच्या यशस्वीतेवर अवलंबून असणार आहे. एकंदरीत या विषयाला हात घालून या युवा शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात या प्रयोगाला नक्कीच एक आगळीवेगळी ओळख निर्माण होईल यात शंकाच नाही.
Total Users : 10828