
आबिटघर गावातील तरुणांनी सुरू केलेल्या ग्रामस्वच्छता अभियानात आबिटघर ग्रामपंचायतीचा सहभाग...
जोहार इंडिया 24 न्यूज (वाडा प्रतिनिधी )
गार्डीयन कांस्टिग लिमिटेड कंपनी मार्फत ग्रामस्वच्छते साठी पुरविण्यात आलेल्या घंटागाडीचे आज रोजी कंपनी व्यवस्थापनाने वितरण केले.
सदर घंटागाडीचे ग्रामपंचयतीतर्फे स्वीकार करण्यात आला असून या पुढील सर्व जबाबदारी ग्रामपंचायतीने घेतली असल्याचे सूतोवाच ग्रामपंचायत कार्यकारिणीतर्फे करण्यात आले.
या प्रसंगी कंपनी मालक श्री.बाबूजी,संचालक श्री.श्रवण शेट, व्यवस्थापक श्री.तनय गिरी यांच्या कडून सरपंच सौ.साक्षी संतोष साठे,उपसरपंच श्री.कुलदीप पाटील, ज्येष्ठ सदस्य श्री.भरत जाधव,सौ.सुप्रिया पाटील यांनी वाहनाचा ताबा घेतला.गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.सुभाष पाटील यांनी नारळ वाढवून सदर वाहनाचे उद्घाटन करून कामकाज करण्यास सुपुर्द केले.
Total Users : 10829