
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन…
प्रा.दिनेश राठोड (जिल्हा प्रतिनिधी ) – वर्धा
दिनांक 23/01/2023 रोजी हिंगणघाट तालुक्यातील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नूतन भारत शिक्षण संस्था वडणेरचे अध्यक्ष श्री कृष्णाजी महाजन साहेब उपस्थित होते त्यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका सौ.वंदना खैरे यांनी शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला. त्याचबरोबर मैदानवर विविध खेळ खेळा. निरोगी राहा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख प्रा.डी.एच. राठोड यांनी केले यांनी केले,लगेच विविध खेळाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली, कबड्डी,खो खो लंगडी,100 मीटर धावणे,या खेळात वर्ग 5 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला, अतिशय चुरशीचे व शिष्यबद्ध सामने रंगले,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय खेळ व क्रीडा स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करणे आवश्यक असते,शालेय अभ्यासक्रमाबरोबरचं क्रीडा व खेल अत्यावश्यक आहे असे मत प्रा.दौलतकर यांनी मांडले या स्पर्धेच्या यशस्वीते करिता प्रा.ढाले,प्रा.इंगळे,प्रा,लोणावळे, प्रा.मोगरे,प्रा,कडू,.क्रीडा सहप्रमुख सौ.के.व्ही.
मशाक्षेत्री,कु.वाय.श्री.एम.एल. तलवतकर क्रीडा सहप्रमुख कु.वाय के.महाजन,ओ.व्ही मडावी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले,याप्रसंगी सर्व विद्यार्थी व अनेक पालक उपस्थित होते.

Total Users : 10829