
माडाचापाडा या गावातील नागरिकांना व शाळेतील मुलांना द पेपर रिवोलूश न फाऊंडेशन ठाणे यांची पूर्ण टीम मार्फत लोकांना दुर्बीण द्वारे चंद्र, तारे दाखवण्यात आले.
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )विक्रमगड – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – विक्रमगड तालुक्यातील माडाचापाडा हे गाव दुर्गम भागात मोडत असून येथील शेतकऱ्यांना विविध योजना दिल्या जातात त्याचा लाभ योग्य रीतीने करत असतात त्याच प्रकारे या ठिकाणी विविध ठिकाणचे लोक येत असतात आणि येथील नागरिकांना मार्गदर्शन करतात.
तर अश्याच प्रकारे येथील नागरिकांना दिनांक २७/०१/२०२३ रोजी द पेपर रेवो लुशन फाऊंडेशन ठाणे यांची पूर्ण टीम मार्फत माडाचापाडा येथील लोकांना तसेच शाळेतील मुलांना दुर्बीण द्वारे चंद्र, तारे दाखवण्यात आले तसेच इतर काही माहिती ताऱ्या विषयी देण्यात आली.
ही माहिती देत असताना माननीय श्री. प्रणव प्रकाश पाटील साहेब, आणि नवनिर्वाच ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य मा. श्री. रमण देवळे सर तसेच गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
Total Users : 10829