
यारी दोस्ती ग्रुप कडून प्रजासत्ताक दिनानिमित्त शैक्षणिक उपक्रम साजरा….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये विक्रमगड.
दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी, वाडा तालुक्यातील खुपरी येथे यारी दोस्ती फाऊंडेशन पालघर मार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.
सदर शैक्षणिक उपक्रमात शाळकरी मुलांच्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या, आणि त्यातून सर्वोत्कृष्ट चित्र काढलेल्या आणि प्रथम, दृतिय आणि तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले आणि ग्रुप सदस्यांना युवा मार्गदर्शन करण्यात आले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शाळेतील मुलांना उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्या, पेन आणि पेन्सिल आदी. साहित्य वाटप करण्यात आले आणि शेवटी सर्व विद्यार्थ्याना खाऊ, चोकलेट चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात ग्रुप मार्फत रक्तदान केलेल्या सदस्यांना प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय BSF जवान श्री. समशाद शय्यद शेख उपस्थित होते त्यांना या दिनी ग्रुप कडून प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे, गावातील ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी आणि यारी दोस्ती ग्रुप पालघर चे सदस्य उपस्थित होते.

Total Users : 10829