ji24news

शेतात मोबाईल चार्जिंग, फॅनसह विविध वस्तू चार्जिंग करण्यासाठी शेतकरी पुत्राचा जुगाड..

शेतात मोबाईल चार्जिंग, फॅनसह विविध वस्तू चार्जिंग करण्यासाठी शेतकरी पुत्राचा जुगाड

प्रा.दिनेश राठोड – (जिल्हा प्रतिनिधी वर्धा )

वर्धा – शेतातील उभ्या असलेल्या पीकांचं वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी (farmer) लाकडी मचाण तयार करुन शेतात वस्तीला थांबतात.
पण शेतकऱ्यांना शेतात थांबल्यानंतर अनेक अडचणी येतात. ती समस्या एका शेतकरी पुत्राने सोडवल्याने त्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. वर्धा जिल्ह्यातील (wardha) कासारखेडा (kasarkheda) येथील योगेश लिचडे याने मजबूत स्ट्रक्चरचं सुविधायुक्त मचाण तयार केलं आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये सुरक्षा मजबूत करण्यात आली आहे.
शेतकरी मचाण

वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील कासारखेडा येथील योगेश माणिक लिचडे याने घरी शेती असल्यामुळं त्यातील अडचणी दूर केल्या आहेत. शेतात पिकांची निगराणी करताना लाकडी मचाणीवर थांबतानाही शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळं योगेशनं सुरक्षित मचाण तयार करण्यासाठी प्रयत्न केला. शेतात काम करताना शेतकऱ्यांचा वन्यप्राणी त्याचबरोबर पाऊस, वीज यापासून बचाव व्हावा, यासाठी योगेशने कल्पकतेने मचाण तयार केले. हे मजबूत स्ट्रक्चरच मचाण शेतक-यांसाठी नक्कीच फायद्याचं ठरणार आहे.
तयार करण्यात आलेल्या मचाणाची माहिती

मचाणची उंची 5 ते 6 फूट आणि वजन जवळपास 550 किलो आहे. यावर विद्युतरोधक लावण्यात आले आहे. वरील भागावर सोलर पॅनल लावलाय. त्याचबरोबर सोलरवर ऑपरेटिंगवर पंखा, लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. मचाणमध्ये रेडिओसारखी मनोरंजनाची तसेच मोबाईल चार्जिंगचीही सुविधा केली आहे. मचाणमध्ये दोन जण आरामात थांबू शकतात. यास त्याला झुला देखील लावलाय. अनेक शेतकऱ्यांनी अशा मचाणची मागणी केली आहे.त्याचबरोबर त्यांच्या मागणीनुसार मचान देणार असल्याचं योगेशन शेतकऱ्यांना सांगितलं आहे.
मचाणकरीता लोखंडी तसेच आवश्यक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. भविष्यात कमी खर्चात जास्तीत जास्त शेतकऱ्याना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं योगेशन सांगितलंय.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर