
परीक्षा पे चर्चात जिल्ह्यातील 950 शाळांचा सहभाग….
प्रा.दिनेश राठोड (वर्धा – जिल्हा प्रतिनिधी)
दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमातून देशातील लाखो विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील 950 शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. न्यू इंग्लिश हायस्कूल वर्धा येथील या कार्यक्रमात आ. डॉ. पंकज भोयर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी उषा तळवेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती कुलकर्णी, उपमुुख्याध्यापक अनघा आगवण सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील 950 शाळांतील 80 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कुटुंबामध्ये मुलांकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. चांगलं काम करीत असाल तर तुमच्याकडून अपेक्षाही असतीलच, असे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले. विद्यार्थ्यांना भविष्यातील यशस्वीतेसाठी काही टिप्स देखील त्यांनी दिल्या. या कार्यक्रमातून विद्यार्थी माझी पण परीक्षा घेत आहे, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम
आयोजित करण्यात आला होता. वेबिनार, दूरदर्शन, रेडिओच्या माध्यमातून देखील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसत होता. विद्यार्थ्यांसोबतच शाळांचे शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Total Users : 10829