
महाविकास आघाडी तर्फे रास्ता रोको आंदोलन…..
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) दीपक भोये
विक्रमगड.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा
यांना पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यानी अरेरावीची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक दिल्याचे निषेधार्थ आज विक्रमगड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई मंत्रालयात एका बैठकीमध्ये गैरवर्तन करून एका आदिवासी आमदार अरेरावीची भाषा वापरून अपमानस्पद वागणूक दिली. ये संबंधित आदिवासीॲक्ट 1989 नुसार ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र आमदार सुनील भुसारा यांच्याकडून पोलीस आयुक्त कल्याण मुंबई पत्र यांना देण्यात आले आहे. एका आदिवासी लोकप्रतिनिधीला पालघर जिल्हाधिकारी यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल आदिवासी जनतेचा अपमान झाला असून त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.या रास्ता रोको आंदोलना राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश दोडे व विक्रमगड पंचायत समिती सभापती यशवंत कनोजा सर शिवसेना विक्रमगड तालुकाध्यक्ष (ठाकरे गट ) संजय आगीवले विक्रमगड तालुका काँग्रेस अध्यक्ष घनश्याम आळशी , रमण कोरडा, संजय आळशी, यादव गभाले, योगेश भानुषाली, भरत भोये, अभिषेक जाधव, विजय वेखंडे, महा विकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
Total Users : 10829