
चार भिंतीच्या बाहेर गुरवपाड्यात भिंती रंगवून आनंददायी वातावरणात चालते बोलते शिक्षण….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये .विक्रमगड.
जिल्हा परिषद शाळा गुरवपाडा व प्रथम एज्युकेशन सामाजिक संस्था यांच्यामार्फत पाड्यात बोलक्या भिंती झाल्या फळा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलेला आहे. शिक्षण हे चार भिंतीच्या आतच नसून शिक्षणाचे द्वार हे खुल्या वातावरणात उघडे करून चालता बोलता, खेळताना सुद्धा मुले शिकू शकतात आणि आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकास करू शकतो हा या माध्यमच्या मागचा उद्देश आहे. मुलांना वेगवेगळे माध्यमातून शिक्षण दिले तर चांगले शिकण्यासाठी मदत होते. या भिंती मुळे मुलांना हे नक्कीच शाळेतील अभ्यासक्रमावर व गाव पाड्यांमध्ये पण विद्यार्थी आणि गावकरी वाचन करू शकतील यासाठी पाढ्यातील भिंतीवर अभ्यासाचे धडे रंगवण्याचा उपक्रम ठरविला. त्यामध्ये गणितातील संख्या प्रकार, भाषा विषय, इंग्रजी विषय, भूमिती सूत्रे अशा बोलक्या भिंती रंगवल्या आहेत. आज रोजी गावात रंगवलेला बोलक्या भिंतीवर सोबतच प्रत्येक विषयाचे असे भिंतीवर रंगवल्या जावेत हे मुलांच्या विकासासाठी उपयुक्त ठरत आहेत असे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व गावकरी यांनी सहभाग घेतला. मुख्याध्यापक केशव भोये, शिक्षक दशरथ धुमाळ, सुरेश भांड, गुरु तिरणकण, विनोद कोरडे, गोपी कोदे, अंकुश खांजोडे आदी सहकार्य करीत आहेत.
Total Users : 10829