ji24news

महिलांच्या आरोग्य समस्या व त्यांचे निराकरण यावर गृहअर्थशास्त्र विभागाद्वारे मार्गदर्शनाचे आयोजन…

महिलांच्या आरोग्य समस्या व त्यांचे निराकरण यावर गृहअर्थशास्त्र विभागाद्वारे मार्गदर्शनाचे आयोजन….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा.दिनेश राठोड (जिल्हा– वर्धा)
श्री.साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर येथे गृह अर्थशास्त्र विभागाद्वारे गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आरती देशमुख यांनी विद्यार्थिनींसाठी ‘महिलांच्या आरोग्य समस्या व त्यांचे निराकरण’ या विषयावर विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. यासाठी आरोग्य सेवक ऋषिकेश दुर्गे व आशा वर्कर लता ठाकरे, यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थिनींना मिळाला. यावेळी ऋषिकेश दुर्गे म्हणाले की, ‘कुटुंबातील प्रापंचिक धांदलीमुळे महिला आपल्या आरोग्याकडे हवे तेवढे लक्ष देत नाहीत. महिला जशा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतात तशीच काळजी महिलांनी आपल्या स्वत: च्या शरीर प्रकृतीची घ्यावी. महिलांच्या तब्बेतीविषयीच्या संधिवात, डायबिटीस, उच्च रक्तदाब, अनियमित मासिक पाळी अशा विविध तक्रारी असतात. विद्यार्थीनींनी व महिलांनी आपल्या शारीरिक आजारांविषयी जागरूक राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वेळोवेळी सल्ला घेतला पाहिजे. या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थीनींनी व महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन डॉ. ऋषिकेश दुर्गे हॉस्पिटल प्रमुख यांनी केले.  आशा वर्कर लता ठाकरे  यांनी,मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींनी स्वतःची काळजी कशाप्रकारे घेतल्या पाहिजे यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. आरती देशमुख यांनी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यामागचे कारण स्पष्ट केले व त्या म्हणाल्या की, ‘मासिक पाळी हा सर्व विद्यार्थिनी व महिला वर्गासाठी मोठा प्रश्न आहे. त्याविषयी आपल्या समाजात खूप  गैरसमज आहेत. पिरिअडच्या कालावधीत देवाला शिवायचे नाही, स्वयंपाक करायचे नाही, बाहेर बसणे, या गोष्टी पहायला मिळतात. पूर्वापार चालत आलेली ही एक प्रथा आहे. विशेष म्हणजे त्यामागे कोणतेही लॉजिक नाही. मासिक पाळी पुढे जावी म्हणून गोळी घेतली जाते. अशा गोळ्या वारंवार घेण्याने आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे औषधांचा वापर शक्यतो टाळावा. पिरिअड चालू असल्यामुळे अशक्तपणा, कमजोरपणा जाणवतो, यासाठी फळे आणि ताज्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. एकूणच सकस आहार घेतला पाहिजे. आजकाल विद्यार्थिनी फास्टफूड खाणे पसंत करतात पण ते टाळणे गरजेचे आहे. या काळात आपल्या शरीराची योग्य ती काळजी घ्यावी तसेच स्वच्छता विषयक बाबींचा सर्वांनी अवलंब करणे आवश्यक आहे.’ असे सांगून विद्यार्थिनींना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन सत्रानंतर विद्यार्थीनींनी आरोग्याविषयी प्रश्न विचारले असता ऋषिकेश दुर्गे यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी डॉ. नरेश भोयर, डॉ. विनोद मुडे , डॉ. प्रवीण कारंजकर,डॉ. विठ्ठल घीनमीने, डॉ.संजय दिवेकर, प्रीती सायंकार, विजयालक्ष्मी जारोंडे आदी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर