ji24news

जगजीवनराम माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक महोत्सव..

जगजीवनराम माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक महोत्सव
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा.दिनेश राठोड (जिल्हा -वर्धा )
दलित मित्र दिवंगत ऍडव्होकेट. शंकररावजी सोनवणे साहेब, संस्थापक अध्यक्ष ठक्कर बाप्पा सेवा समाज,वर्धा तथा माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 114 व्या जयंती प्रित्यर्थ व विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव निमित्त
सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन नवभारत अध्यापक विद्यालय, जगजीवनराम माध्यमिक विद्यालय तथा नवभारत प्राथमिक अभ्यास शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.
सदर सांस्कृतिक महोत्सवास अध्यक्ष म्हणून सौ. कविताताई लक्ष्मीनारायण सोनवणे, उपाध्यक्ष ठक्कर बाप्पा सेवासमज वर्धा, महोत्सवाचे उद्घाटक मा. डॉ. नीतू सुनील गावंडे ज्येष्ठ अधिव्याख्याता ,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा, तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. शीला अनिल सोनवणे कोषाध्यक्ष ठक्करबाप्पा सेवा समाज, वर्धा तसेच रेखाताई नयन सोनवणे ज्येष्ठ समाजसेविका, वर्धा या मंचावर उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या कलागुलांच्या विकासास वाव मिळावा या उदात्त हेतूने विद्यालयामध्ये सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते ज्यामध्ये विद्यार्थी नृत्य, नाटक, एकांकिका अशा विविध प्रकारात आपले कौशल्य दाखवतात. विद्यालयातील स्काऊट गाईड कॅम्प मेळावा, महोत्सवाचे सूत्रसंचालन करणाऱ्या विद्यार्थिनी, पाहुण्यांचे स्वागत करताना विद्यार्थ्यांचा सहभाग हे सगळे बघून या विद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे हे दृष्टीत पडते असे विचार कार्यक्रमाच्या उद्घाटिका डॉ.नीतू गावंडे यांनी व्यक्त केले व महोत्सवाचे रीतसर उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.
शाळेतील आनंददायी वातावरण पाहून तसेच प्रत्येक गोष्टीत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग बघून फार आनंद झाल्याचे विचार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा संस्थेच्या कोषाध्यक्ष सौ शीला अनिल सोनवणे यांनी व्यक्त केले
समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी व त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात अनण्याच्या उदात्त हेतूने साहेबांनी या संस्थेची स्थापना केली व या संस्थेमार्फत समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य निरंतर सुरू आहे याचे समाधान वाटते ,असे विचार ज्येष्ठ समाजसेविका सौ. रेखाताई सोनवणे यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष कविताताई सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांचे कौतुक केले.
सदर महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे लोकनृत्य, एकलनृत्य तसेच सांघिक नृत्य, नाटक विद्यार्थ्यांनी सादर केली. सदर महोत्सवास प्राचार्य सुनील गावंडे ,मुख्याध्यापक श्री. रेवचंद भावेकर नवभारत प्राथमिक अभ्यास शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रशांत नागपुरे, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर