
जगजीवनराम माध्यमिक विद्यालयात क्रीडा महोत्सव तथा स्काऊट गाईड मेळाव्याचे आयोजन…..
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा.दिनेश राठोड ( जिल्हा – वर्धा)
दिवंगत एडवोकेट शंकरराव सोनवणे साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा संस्थापक अध्यक्ष ठक्करबाप्पा सेवा समाज, वर्धा यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त व विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव वर्षा निमित्त क्रीडा महोत्सव व स्काऊट गाईड एक दिवशीय मेळाव्याचे आयोजन नवभारत अध्यापक विद्यालय ,जगजीवन राम माध्यमिक विद्यालय तसेच नवभारत प्राथमिक अभ्यास शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9:00 वाजता करण्यात आले.
सदर महोत्सवासाठी अध्यक्ष म्हणून नयनभाऊ सोनवणे, सहसचिव ठक्करबाप्पा सेवा समाज वर्धा, क्रीडा महोत्सवाचे उद्घघाटक म्हणून माजी प्राचार्य तथा छत्रपती पुरस्कार प्राप्त श्री किशोर पोफळी,तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री लक्ष्मीनारायण सोनवणे माजी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा तसेच सचिव ठक्कर बाप्पा सेवा समाज वर्धा, भारत स्काऊट- गाईड जिल्हा संघटक श्री. नितेश झाडे, संस्थेचे संचालक तथा माजी मुख्याध्यापक श्री. मधुकरराव वानखेडे, प्राचार्य श्री सुनिल गावंडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रेवचंद भावेकर, नवभारत प्राथमिक अभ्यास शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत नागपूरे मंचावर उपस्थित होते.
जिल्हा स्काऊट गाईड संघटक श्री नितेश झाडे यांनी भारत स्काऊट गाईड राष्ट्रीय मेळाव्यातील(झांबोरी) वर्धा जिल्ह्याचा कृतीशील सहभाग व अनुभव कथन केले.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक विकासासाठी विविध खेळ खेळणे आवश्यक आहे. त्यासाठीच खेळाच्या स्पर्धा विद्यालयात आयोजीत केल्या जातात.शाळेतील क्रीडांगण,आखणी केलेली मैदाने पाहून मी भारावून गेलो असे विचार व्यक्त करून क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.
महोत्सवाचे प्रमुख अतिथी माननीय श्री लक्ष्मीनारायण सोनवणे साहेब तसेच श्री मधुकर जी वानखेडे यांनी सदर क्रीडा महोत्सव प्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्काऊट मास्टर श्री जंगले सर तर संचालन श्री अभय मकेश्वर व सौ अर्चना चरडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजेश कापसे यांनी मानले.
Total Users : 10829