ji24news

हिंगणघाट येथे जगतगुरु संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी…

हिंगणघाट येथे जगतगुरु संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी….
प्रा.दिनेश राठोड ( जिल्हा प्रतिनिधी- वर्धा )

हिंगणघाट येथील गोर बंजारा समाज संस्थेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची २८४ वी जयंती कलोडे चौकातील हनुमान मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य श्री बळीराम चव्हाण (नायक गोरभाई तांडा हिंगणघाट) तर प्रमुख पाहुणे त्यांचे जेष्ठ बंधू श्री चव्हाण साहेब उपस्थित होते,त्याचबरोबर मंचावर हिंगणघाट तांड्याचे कारभारी श्री उल्हास राठोड हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक श्री सुधीरभाऊ राठोड यांनी केले व प्रास्ताविक श्री पवार सर यांनी केले या कार्यक्रमात हिंगणघाट परिसरात विविध विभागात कार्यरत अधिकारी,
कर्मचारी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नायक श्री बळीराम चव्हाण सरांनी सांगितले की, संत सेवालाल महाराजांचे अनमोल विचार समाजाला योग्य दिशा देणारे आहेत. प्रगती साधायची असेल तर आयुष्यात गुरूचे फार महत्त्व आहे. सेवालाल महाराज आपल्या सर्वांचेच गुरू आहेत.समाजात ऐक्याची भावना जोपासा एकमेकांना गरजेच्या व अडचणीच्या वेळी मदत करा,आपली संस्कृती आपली भाषा जपा तळागाळातील लोकांस मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करा
असे आवाहन केले, पुढे बोलताना ते म्हणाले की,हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री काळातील कार्यावर प्रकाश टाकला.जलक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्यावर प्रकाश टाकला व सध्याचे कॅबिनेट मंत्री श्री संजयभाऊ राठोड यांनी श्री क्षेत्र पोहरादेवीच्या विकासासाठी गोरसंस्कृती चे जतन व संवर्धनासाठी शासनाकडून भरघोस निधी प्राप्त करून दिला याबाबत माहिती दिली,
श्री उल्हास राठोड सर कारभारी म्हणाले की, संत सेवालाल महाराजांच्या शिकवणीमुळे बंजारा समाजात आमुलाग्र बदल घडून आलेला आहे.आज प्रत्येक विभागात बंजारा समाजाचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत व आपल्या कार्यशैलीमुळे व्यक्तीमत्वाची छाप पडत आहेत,याच कार्यक्रम कृषी अधिकारी श्री राठोड साहेब म्हणाले की,बंजारा समाजाचा खरा इतिहास आपण समोर आणला पाहिजे एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत असा समज आज आर्थिक,सामाजिक व राजकीय दृष्टया मागास झालेला आहे त्याला पूर्व वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू भारतीय नकाशाचे जनकही जनगळात भटकणार हा बंजारा समाजच असल्याचे त्यांनी सांगितले,तसेच प्रा.दिनेश राठोड यांनी संत श्री सेवालाल महाराज यांचे अनमोल विचार त्यांनी दाखविलेला मार्ग आपण आत्मसात करायला हवे असे सांगितले त्याचबरोबर बंजारा समाजाचे जगातील सर्वात श्रीमंत व्यापारी लाखा बंजारा यांच्या कार्याला उजाळा दिला
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री विनायक जाधव सरांनी केले या कार्यक्रमात जवळपास 40 कुटुंबातील मान्यवर उपस्थित होते,

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर