
भाववाढीच्या प्रतीक्षेत घरी ठेवलेल्या कापसावर किटकांचा प्रभाव
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा.दिनेश राठोड ( जिल्हा:- वर्धा
यंदाच्या हंगामात कापसाला फक्त ८ हजार रूपये क्विंटल भाव मिळत असल्याने कापसाचे भाव वाढेल या आशेने शेतकर्यांने आपला कापूस मार्केटला न नेता घरातच गंजी मारून ठेवला आहे पण पूष्कळ दिवस गंजी मारून ठेवल्याने त्यामध्ये किटके तयार होत असून कीटकांच्या चाव्यामुळे शरीराला खाज सूटत असून चट्टे व घामोळ्याचे प्रमाण वाढले आहे.गतवर्षीच्या तुलनेत कापसाला कमी भाव मिळत असल्याने शेतकर्यांने कापूस घरातच साठवून ठेवला परिणामी शेतकर्यांसमोर नवीन संकट आ वासून उभे राहिले आहे.कापसात किटक तयार होत असून किटकांच्या चाव्यामुळे शरीरावर खाजेचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.विशेष करून लहान मूलांना याचा परिणाम होतांना दिसून येत आहे.कापसाची गंजी जास्त दिवस ठेवल्याने त्यामध्ये काही दिवसात किटकाची उत्पत्ती होते व त्यातील काही किटक चावल्याने अंगाला घामोळ्या येणे,खाज सूटणे अशी लक्षणे दिसून येतात याची खबरदारी म्हणून कापसाच्या संपर्कात न येण्याचा सल्ला डॉक्टर देत आहे.अशा परिस्थितीत आम्ही काय करावे असा मोठा पेच शेतकर्यांसमोर असून इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे.
Total Users : 10829