
नवभारत अध्यापक विद्यालय व जगजीवनराम माध्यमिक विद्यालय वर्धा येथे संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती साजरी.
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा.दिनेश राठोड (जिल्हा ) – वर्धा
दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी नवभारत अध्यापक विद्यालय व जगजीवन राम माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यापऺण जगजीवन राम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रेवचंद भावेकर व पर्यवेक्षक रमेश निमसडकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश मसराम यांनी केले. नवभारत अध्यापक विद्यालयाचे अध्यापकाचार्य श्रावण राठोड यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच संत सेवालाल महाराज यांचे क्रांतिकारी व समाज सुधारणा विषयक तसेच पर्यावरण संरक्षणाविषयक, अंधश्रद्धा निर्मूलन विषयक विचार , तसेच संत सेवालाल महाराजांचे विचार आजच्या प्रत्येक मानवासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतात असे विचार व्यक्त केले.
सदरच्या कार्यक्रमास नवभारत अध्यापक विद्यालय व जगजीवन राम माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगजीवन राम माध्यमिक विद्यालयाचे महेश मसराम यांनी केले.
Total Users : 10829