
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी…..
प्रा.दिनेश राठोड
ji24 न्यूज (जिल्हा प्रतिनिधी – वर्धा.)
परमप्रतापी,महापराक्रमी,जाणता राजा,राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असलेल्या माहितीवर विद्यार्थ्यांनी विविध भाषणे,नाटके गीत व पोवाड्यांचे सादरीकरण केले. यामुळे शाळेमध्ये शिवमय वातावरण निर्माण झाल्याने चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजच्या प्राचार्या सौ.वंदना खैरे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ प्रा.शरद ढाले उपस्थित होते त्यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रा.दिनेश राठोड यांनी केले,
शिवरायांच्या व वीर मावळ्यांच्या कथा,पराक्रम याबाबत इयत्ता पाचवी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी कथन केले. विद्यार्थ्यांनी भाषणे, पोवाडे, पाळणे गीत गायन करून शिवजयंती उत्सवात सहभाग घेतला. याप्रसंगी प्राचार्या वंदना खैरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या अंगी असलेलं गुण विद्यार्थ्यांनी अंगिकारावे असे अवाहन केले श्री ओंकार मडावी यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतांना गनिमी कावाबद्दल,अफजल खान भेट,साहिस्तेखान फजिती याबाबद्दल माहिती दिली,शिक्षकेत्तर कर्मचारी धनराज गावंडे यांनी पहाडी आवाजात गीतगायन केले याप्रसंगी प्रा.गजानन लोणावळे, प्रा.सौ.मंजुषा महाजन,
प्रा.कु.प्रणाली कडू,प्रा.कु.स्मिता लाहोरे,स.शिक्षिका सौ.कल्पना मडावी स.शि.श्री मोहन तलवटकर स.शि.सौ.योगिता काटेखाये,नाईक श्री धनराज गावंडे,प्रयोगशाळा प.सौ.लता चंदनखेडे उपस्थित होते,
प्रा छत्रपती दौलतकर यांनी शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळ व नियोजन या विषयी माहिती दिली आणि त्यांनी या कार्यक्रमाचे
आभारप्रदर्शन केले,तद्नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.
Total Users : 10829