ji24news

-यारी दोस्ती ग्रुप कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शैक्षणिक उपक्रम साजरा.

-यारी दोस्ती ग्रुप कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शैक्षणिक उपक्रम साजरा. ….….

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी, डहाणू तालुक्यातील आशागड येथील चरी कोटबी ( खिंडपाडा) ह्या जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित यारी दोस्ती फाऊंडेशन पालघर कडून शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांची संपूर्ण जगभर साजरी करत असताना यारी दोस्ती ग्रुप ने या दिवशी शाळेत जावून विद्यार्थ्यांना सोबत घेवून जयंती साजरी केली. सदर शाळेला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देवून त्या विद्यार्थ्यांना महाराजांबद्दल त्यांच्या इतिहास, युद्धनीती, अर्थनिती, पर्यावरण नीती या संदर्भात माहिती देण्यात आली. या शाळेतील कु. लाडक्या पालकर हा विद्यार्थी १ ते १५० पर्यंत तोंडी पाढे बोलतो आहे. हे त्यांचे वैशिष्टे लक्षात घेवून त्या विद्यार्थ्याला ग्रुप कडून सन्मान चिन्ह, स्कूल बॅग, वही, पेन, कंपास बॉक्स इत्यादी साहित्य एक छोटीची मदत म्हणून देवून गौरविण्यात आले. या एवढ्या हुशार विद्यार्थ्याला आई नसून तो त्यांच्या आजी आजोबा कडे राहून या गरिबीच्या कठीण परिस्थितीतून अभ्यास करून आपले व आपल्या शाळेचे नाव मोठे करतोय हे खूपच कौतुकास्पद आहे.
तसेच या शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्या आणि पेन आदी साहित्य वाटप केले, आणि कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्याना चोकलेट वाटप केले.
सदर कार्यक्रमात चरी कोटबी गावातील मान्यवर, शाळेचे शिक्षक श्री. अंकुश दडे सर, श्री. विशाल कदम सर आणि यारी दोस्ती फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. शाळेतील सरांनी सदर शाळेत शैक्षणिक उपक्रम राबविला यारी दोस्ती फाउंडेशन चे खूप खूप आभार मानले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर