ji24news

शिक्षक शिकविणार विद्यार्थी परीक्षा देणार परीक्षा घेण्याऱ्या शिक्षकांवर महसूल विभाग नियंत्रण ठेवणार!

शिक्षक शिकविणार विद्यार्थी परीक्षा देणार परीक्षा घेण्याऱ्या शिक्षकांवर महसूल विभाग नियंत्रण ठेवणार!
प्रा.दिनेश राठोड (ji 24 न्यूज) जिल्हा प्रतिनिधी- वर्धा.

बारावीच्या परीक्षेची जबाबदारी बोर्डाने शिक्षक व शिक्षण खात्यावर टाकली असली तरी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम महसूल खाते करणार असल्याने शिक्षक संताप व्यक्त करीत आहे. परीक्षेत गैरवापर दिसून आल्यास पर्यवेक्षक शिक्षकांवर कारवाई करण्याची तंबी मिळाली आहे.अनेक ठिकाणी तर शिक्षक बारकोड स्टिकर लावतांना विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका सरळ कर, व्यवस्थित स्टिकर लावू दे,
होलोग्राप व्यवस्थित लागले की नाही,अशी काळजीपूर्वक विचारपूस शिक्षक करत असतांना बैठे पथकातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यवेक्षकांना तुम्ही मुद्दाम विद्यार्थ्यांशी विनाकारण सवांद साधून मदत करीत असल्याचे सांगत होते,असे काही पर्यवेक्षकांचे म्हणणे आहे
शिक्षक नेते अजय भोयर यांनी आज शिक्षणमंत्र्यांनी फॅक्सद्वारे निवेदन पाठवून शिक्षकांवर अविश्वास असेल तर परीक्षा यंत्रणा महसूल विभागाकडे सोपविण्याचा टोला लगावला आहे.शिक्षकांची परीक्षेची जबाबदारी काढून घेतल्यास उत्तम,अशी टिपणी त्यांनी निवेदनातून केली आहे.जनगणना,अतिमहत्त्वाचे निवडणूकीची कामें,सरकारची महत्वाची सर्वेक्षणाचे कामें तसेच अन्य कामात शिक्षक चांगले काम करतात म्हणून बतावणी करायची आणि त्यांची जबाबदारी असणाऱ्या परीक्षेच्या कामात महसुलचे पथक नेमायचे. हे दुटप्पी धोरण कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी शासनाने तहसीलदार व तत्सम अधिकारी वर्ग लक्ष ठेवण्यासाठी नेमला आहे.तरी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिक्षकांशी विश्वासपूर्व व आदरपूर्वक वागावे अशी मागणी शिक्षक वर्गाकडून केली जात आहे,

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर