
बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचे साठ हजार रुपये लंपास…..
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )-दीपक भोये विक्रमगड.
वसुरी येथील काशी काशिनाथ गावित (५५) ही महिला बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पैसे काढण्यासाठी आली होती. तिच्यासोबत कोणीच नसल्याचे पाहून दोन भामट्यांनी तिला विश्वासात घेऊन पैसे मोजून देतो. असा बहाना करून दोन लाख रुपया मधून साठ हजार पोबारा केले.
काशी गावित ही महिला भोपाली आश्रम शाळेत स्वयंपाकी कार्यरत आहे.
त्या मंगळवारी दोन लाख रुपये काढण्यासाठी आल्या होत्या. मात्र त्यांच्या बरोबर कुणी नव्हतं हे पाहून दोन भामट्यांनी तिला विश्वासत घेऊन पैसे मोजून देतो असे सांगून त्यांनी दोन लाख रुपये मोजण्यास सुरुवात केले. साठ हजार रुपये मोजून झाल्यावर मोजणाऱ्या महिलेला चार नोटा दिल्या व सांगितलं चार नोटा खोट्या आहेत त्या बदलून घ्या त्या नोटा काउंटर वर घेऊन गेल्यावर कॅशियरने सांगितलं की खऱ्या नोटा आहेत. त्यानंतर महिलेने नोटा घेऊन घरी आली. रात्री त्यांनी नोटा मोजल्या साठ हजार कमी असल्याचे निदर्शनात आल्यावर दुसरा दिवशी बँकेत येऊन पैसे कमी असल्याचे सांगितले. बँकेतील कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर दोन भामट्यांनी महिलेची फसवणूक केल्याचे दिसले. त्यानंतर ही बाब पोलिसांना सांगण्यात आल्यावर त्यांनी तपास सुरू केला आहे. हे दोन भामटे डीओ कंपनीची स्कुटी घेऊन आल्याचे बँकेच्या उजव्या बाजूला विक्रमगड पाटील पाडा दिशेने पळून जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरे दिसले
Total Users : 10829