
दानात दान रक्तदान, समाजात वाढेल मान!
रक्तदान श्रेष्ठदान मानू या, चला रक्तदान करू या.!!
प्रतिनिधी- दीपक भोये विक्रमगड ji24 news.
दिनांक ०६ मार्च २०२३ रोजी, वाडा तालुक्यातील सौ. अक्षता अक्षय गोवारी (२४ वर्षे) या रुग्ण प्रसुती साठी वाडा येथील हॉस्पिटल मध्ये एडमिट होत्या. त्या वेळी त्यांना रक्ताची नितांत आवश्यकता होती. इतरत्र खूपच रक्ताची चौकशी केली असता त्यांना कुठेही रक्त उपलब्ध झाले नाही. म्हणूनच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून “यारी दोस्ती” या व्हॉटसॲप ग्रुप वर संपर्क केला.
याच यारी दोस्ती ग्रुप मधील विक्रमगड तालुक्यातील देहर्जे गावातील ग्रुप सदस्य धिरज दुमाडा आणि ऋषिकेश दुमाडा हे तत्काळ रक्त द्यायला तयार झाले. त्यांनी जव्हार येथील रक्त पेढीत जावून त्यांना रक्तदान केले.
आज “यारी दोस्ती फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य” या माध्यमातून सर्व मित्रांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून सोशल मीडियाच्या आधारे गरजूसाठी अशा प्रकारे मदत करत असतात.
रक्तदान आहे जनतेची सेवा.!
त्यातून मिळेल आपणास मेवा..!!
Total Users : 10829