ji24news

एक गाव एक होळी व धुलीवंदन मोठ्या उत्साहात संपन्न…..

एक गाव एक होळी व धुलीवंदन मोठ्या उत्साहात संपन्न…..

प्रतिनिधी दीपक भोये विक्रमगड ji24news.
विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात प्रामुख्याने ग्रामीण खेडया-पाडयात आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, खोस्ते, सारशी, दादडे या भागात मात्र आजही पारंपारिक पध्दतीनेच सण साजरे करण्यात येतात़ त्यानुसार या गावात एक गाव एक होळीची परंपरा आजही कायम आहे़ पहिले तीन दिवस छोटया होळया, चौथ्या दिवशी चोरटी होळी आणि शेवटच्या म्हणजेच 6 मार्चला पाचव्या दिवशी मोठी होळी असा पाच दिवस हा सण साजरा केला जातो़ या पाच दिवसांत लहान मुले वाजवत असलेल्या डफऱ्यांचा (डफली) आवाज आजही शिमग्याला पारंपारिक रुप देतो आहे़ चोरटी होळीसाठी तरुण गावातूनच लाकडे चोरुन आणतात़ पाचव्या दिवशी सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने मोठी होळी रचली जाते़ या होळीची पारंपारिक पध्दतीने पुजा केली जाते़ गावातील नवविवाहीत जोडप्यांनी या होळीभोवती पाच फेऱ्या मारण्याची पध्दत आहे़ त्यानंतर होळी पेटविली जाते़ होळीत भाजलेल्या नारळांचा प्रसाद घेण्यासाठी सर्वांचीच झुंबड उडत असते़ साखरेच्या पाकापासून तयार केलेले हार लहान मुले होळीच्या दिवशी गळयात घालत असतात. दरवर्षी ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते. त्या जागेला होळीची माळ असे म्हणतात़ याच माळावर पाच दिवस विविध खेळ, गरबानृत्य, मनोरंजनात्मक कार्यक्रम, तर ग्रामीण खेडया पाडयावर तारपा नृत्य, ढोलनाच, व सामूहिक गरबानृत्य असे विविध कार्यक्रम रात्रभर आयोजिले जातात़ होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धूलिवंदनाच्या दिवशी घरोघरी पुरणपोळया केल्या जातात़ धूलिवंदनाला मनसोक्त धुळवड खेळली जाते़ तर रंगपंचमीला गावाकडे झाडा-फुलांपासून तयार केलेले नैसर्गीक रंगच वापले जातात़पोस्त मागण्यांची परंपरा आजही कायमहोळीसाठी सद्यस्थितीत विक्रमगड बाजार फुललेला असून आजूबाजूच्या खेडयावरील आदिवासी लोक बाजाराप्रमाणे चार दिवस गर्दी करीत आहेत. पोसत मागण्याकरीता वेगवेगळया वेषात त्यामध्ये कुणी पुरुष महिलेचे कपडे घालून त्यावेशात तर कुणी तोंडाला अंगाला रंग लाऊन वेगळा पेहराव करुन अगर फुटलेला डबा वाजवत, तोंडाला जोकर आदींचा मुखवटा लाऊन घराघरातून दुकानदारांकडून पोस्त (पैसे) मागत असतात. हेच दृष्य धूळवडीपर्यंत चालत असते़ पत्नीला खांद्यावर घेऊन होळीला प्रदक्षिणा : होळीच्या दिवशी भेंडीचे झाड (फांदी)अगर बांबूच्या फांदया होळीमाता म्हणून आणून त्याची पूजा केली जाते़ पूजेला तांदळाच्या नागलीच्या व कुरडई पापडया, पुरणपोळी घरी बनवलेल्या वस्तंूचा नैवैद्य दाखविला जातो़ बांबू किंवा भेंडींच्या फांदीला टोकाला खेडयावर कोंबडीचे पिल्लु बांधले जाते. ही प्रथा आजही आबाधित आहे़ त्याचप्रमाणे नविन लग्न झालेली जोडपी आपल्या पत्नीला खांदयावर घेऊन होळी मातेला प्रदक्षिणा घालण्याची अशी प्रथा असून त्याची आजही अंमलबजावणी होत आहे़

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर