
खापरी ते गांगापुर पांदण रस्ताची झाली दुर्दशा…
प्रा.दिनेश राठोड (ji24news)जिल्हा प्रतिनिधी – वर्धा.
शेतकऱ्यांना शेतामध्ये जायला रस्ताच नाही, पावसाळ्यात तर रस्त्याची व पुलाची झालेली फार दुर्दशा होते,खराब रस्त्यामुळे शेतकरी पुर्णपणे हतबल झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील खापरी गांगापुर येथील पांदण रस्ता हा दोन किलोमीटरचा असून बांमर्डा येथील गांगापुर हायवे क्रमांक सातला शिव जोडला गेला, गांगापुर खापरी येथील शेतकऱ्यांना व शेत मजुरांना शेतामध्ये जाण्यासाठी असलेला हा रस्ता चिखलाने माखलेला दिसून येत आहे , मागील 20 वर्षांपासून शेतकऱ्यांना व शेतमजुरांना व शेतकर्याच्या सर्जा राजाला नाहक त्रास भोगावा लागतो ,शेतामधून घरी आणण्यासाठी कापूस, तूर सोयाबीन , गहू ,हरभरा ,व बियाणे ,खत इत्यादी बैलबंडीने , ट्रॅक्टरने ने आण करण्यास अडचण येत आहे.पावसाळ्यात चिखलात व गाळामध्ये कित्येक दिवस बैलबंडी फसून राहते गांगापुर गावाजवळ जवळ तलाव लागून असल्याने पूर्ण पाणी नाल्यातून वाहते तिथे उडानपूल नसल्याने शेतकऱ्यांना बंडी पावसाळ्यात कशी न्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे , पावसाळ्यात जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यात शेतकऱ्यांची बैल बंडी पलटी सुद्धा झाली ,गंभीर दुखापत बैलांना झाली ,गावालाच लागून असलेले तीर्थक्षेत्र मंदिर गावाच्या मधोमध गाव खापरी गांगापुर बांमर्डा या गावच्यामध्ये एक नागोबाचे मंदिर आहे त्या ठिकाणी भाविक गावोगावचे स्वयंपाक घेऊन त्या ठिकाणी सहभोजन करत असतात उन्हाळ्यात या ठिकणी खापरी , बांमर्डा गांगापुर येथील तीन गावची वर्दळ असते , व या ठिकाणी असा चार चार फुटाचे खोल खड्डे पडलेलं मोठया मोठया भेगा पडून रस्ताची दुर्दशा झाली असल्यामुळे वर्षानूवर्ष हा रोड चिखलाने माखलेला असतो , रस्ताच्या बाजूला नाली नसल्यामुळे शेतातील पाणी ,त्या रस्त्यावर तीन फुटाच्या खोल खड्यामध्ये साचून राहते व मोठे मोठे खड्डे पडून बैलाचे पाय घसरून शेतकऱ्यांच्या बैलाचे नुकसान सुद्धा झाले आहे, त्यामुळे,रस्ताची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी परिसरातिल लोक प्रतिनिधी नागरिक करीत आहेत, खापरी गांगापुर, बांमर्डा ,गावा मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा कोणताही लाभ सुद्धा मिळाला नाही त्या मुळे प्रशासनाने लक्ष देऊन रस्ताचे काम पूर्ण करावे , अशी मागणी केली आहे.
शेतकरी अंबादास हाते यांची प्रतिक्रिया
एकदा माझी बैलबंडी पलटी होऊन माझा जीव वाचला तरी त्या ठिकाणी कोणी येऊन सुद्धा जागेची पाहणी केली नाही, काय रस्ताची दुर्दशा आहे रोड न झाल्यास उपोषण करू.
इतर शेतकरी सातोंने ,रंजित हाते ,रवी कवडे , बुद्ध भूषण जारोंडे ,साटोने ,भैय्याजी मुन , नारायण पोहनकर ,किशोर राऊत, यांनी सुद्धा तात्काळ या बाबीकडे शासनाने लक्ष द्यावे अशी विंनती केली आहे,
Total Users : 10829