
परिवर्तन महिला संस्था मोखाडा, जोशी बेडेकर कॉलेज ठाणे आणि झुव्हेंटस हेल्थ केअर लिमिटेड – मुंबई यांच्या वतीने ग्रामीण महिलांना प्रेशर कुकरचे वाटप…
जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी – मोखाडा
मोखाडा,दि. १५ मार्च रोजी परिवर्तन महिला संस्था मोखाडा, जोशी बेडेकर कॉलेज ठाणे, आणि झुव्हेंटस हेल्थ केअर लिमिटेड मुंबई, यांच्या माध्यमातून मोऱ्हांडा ग्रामपंचायत मधील रांजणपाडा , जांभळीचापाडा या गावातील कौशल्य विकास आधारित प्रकल्पातील महिलांना पिशवी शिवण्याचे प्रशिक्षणाबरोबरच त्यांना परिवर्तन महिला संस्था – मोखाडा च्या संस्थापक मा.वर्षाताई परचुरे आणि जोशी बेडेकर कॉलेज – ठाणे यांच्या माध्यमातून काम मिळऊन दिले. या महिलांना घरकाम आणि कौशल्य विकास काम यांच्यात सांगड घालता यावी. विशेष करून स्वयंपाकामध्ये मदत होऊन वेळ वाचवा म्हणुन या संस्थेच्या माध्यमातून व ठाणे कॉलेज ,झुव्हेंटस हेल्थ केअर लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून स्वयंपाकसाठी आवश्यक प्रेशर कुकर देण्यात आले. यामुळे कामातील गती वाढेल आणि कुटुंबाला मदत होईल. त्याबद्दल महिलांनी व गावकऱ्यांनी संस्थेचे आभार मानले. यावेळी संस्थेचे कार्यकर्ते श्री. पांडुरंग वाघ, मनिषा राऊत , श्री.भास्कर देवळे उपस्थित होते

Total Users : 10829