ji24news

श्रीराम नवमीच्या निमित्ताने जन ग्रामिण सेवा संस्था वाडा व द्रोणा फाऊंडेशनच्या वतीने लोहपे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन..

श्रीराम नवमीच्या निमित्ताने जन ग्रामिण सेवा संस्था वाडा व द्रोणा फाऊंडेशनच्या वतीने लोहपे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन..

प्रतिनिधी- दीपक भोये विक्रमगडji24news.

आज दि. ३१ मार्च २०२३ रोजी वाडा तालुक्यातील लोहपे येथे राम नवमीच्या निमित्ताने जन ग्रामिण सेवा संस्था वाडा यांच्या सौजन्याने द्रोणा फाऊंडेशन ट्रस्ट संचालित राजमाता जिजाऊ धर्मदाय रुग्णालय अंबाडी व आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना लोहपे ,केळठण , निंबवली गाव कमिटी आयोजित आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना लोहपे – केळठण – निंबवली गाव कमिटीचे आदेश पाटील , नितिन पवार , सुभाष जाधव , संदिप पाटील , विनोद फऱ्हाड , निवृत्ती फऱ्हाड, सुभाष गायकर , अस्मिता पाटील , तसेच राजमाता जिजाऊ धर्मदाय रुग्णालय अंबाडीचे डॉ. गीतांजली पवार , डॉ. किर्ती पाटील , रितेश शेलार , प्रिया पाटील , सानिका भोईर , सतिष बुकले , रेश्मा पवार , कविता रांदडा , मयुरी गावित , अश्विनी बेनके , अपर्णा पागी इत्यादी उपस्थित होते.या शिबिरात किडणीवरील आजारावर तपासणी , त्वचेच्या आजारावर तपासणी , मोफत ECG ( हृदयाची तपासणी ) , गरोदर मातांची तपासणी , लिव्हर वरील आजारावर तपासणी , मोफत Blood Suger ( रक्त शर्करा तपासणी ) , नवजात बालकांची व लहान मुलांची तपासणी , अंगदुखी , सांधेदुखी , मोफत आरोग्य तपासणी , ब्लडप्रेशर , डायबिटीस, थॉयरंईड , व इतर आजारांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरास आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे पालघर जिल्हा कमिटी अध्यक्ष तसेच जन ग्रामिण सेवा संस्था वाडा उपाध्यक्ष श्री. अरुण खुलात , आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे पालघर जिल्हा कमिटी संघटक तसेच जन ग्रामिण सेवा संस्था वाडा खजिनदार श्री. नितिन दळवी व सदस्य मनोज गडग यांनी भेट दिली.या आरोग्य शिबिरात १०५ रुग्णांनी लाभ घेतला, शिबिर यशस्वी करण्यासाठी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे लोहपे केळठण निंबवली गाव कमिटीच्या सर्वच सदस्यांनी मेहनत घेतली.कमिटीच्या वतीने जन ग्रामिण सेवा संस्था वाडा , द्रोणा फाऊंडेशन ट्रस्ट संचालित राजमाता जिजाऊ धर्मदाय रुग्णालय अंबाडी यांचे आभार मानण्यात आले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर