ji24news

उटावली ग्रामपंचायत मध्ये कोणतीही परवानगी न घेता तोडले सौचालय.

उटावली ग्रामपंचायत मध्ये कोणतीही परवानगी न घेता तोडले सौचालय.

ji24news.palghar.

विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उटावली मधील जिल्हा परिषद शाळा उटावली येथील वापरात असलेले शौचालय हे वार्ड क्रमांक २ मधील ग्रामपंचायत सदस्य यांनी कोणतीही परवानगी न घेता आपल्या पदाचा गैरवापर करून सौचालय तोडल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलेली आहे.
एका बाजूला शासनाकडून स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शौचालय उपलब्धता आणि त्याचा वापर या गोष्टींवर भर देण्यात येत आहे. मात्र याला हरताळ फासण्याचे काम उटावली ग्रामपंचायत मध्ये बघायला मिळाले आहे. शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधण्याची जबाबदारी शालेय शिक्षण विभागाकडे असताना उटावली ग्रामपंचायत सदस्य महेश चिंतामण भुसारे आणि उज्वला कृष्णा गरेल यांनी कोतीही प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेता तसेच ग्रामसभेची कोणतीही परवानगी नसताना शाळेचे शौचालय तोडले आहे. या संबंधित प्रकरणाची चौकशी होऊन कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनीं केलेली आहे. तसेच पाडण्यात आलेले शौचालय त्वरित संबंधितांकडून स्वखर्चाने पूर्ण करून द्यावे असी लेखी तक्रार ग्रामस्थांनी पंचायत समिती विक्रमगड यांच्याकडे केलेली आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर