
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी…..
प्रा.दिनेश राठोड(ji24news) (जिल्हा प्रतिनिधी – वर्धा.)
दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी प्रज्ञासूर्य,महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हिंगणघाट तालुक्यातील वडणेर येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली,प्राचार्या व्ही सी खैरे यांनी याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रा.छत्रपती दौलतकार यांनी केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या सौ व्ही सी खैरे यांनी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा देत कशाप्रकारे त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.असे प्रतिपादन केले
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शरद ढाले उपस्थित होते,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जीवनावर आधारित असलेल्या माहितीवर विद्यार्थ्यांनी विविध भाषणे,नाटके गीताचे सादरीकरण केले. यामुळे शाळेमध्ये प्रसन्न वातावरण निर्माण झाल्याने चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.
याप्रसंगी शाळेतील नाईक श्री धनराज गावंडे यांनाही गीत सादर केले,तद्नंतर शिक्षक श्री ओंकार मडावी यांनी आपले विचार व्यक्त केले,प्रा दिनेश राठोड ह्यांनी भाषण व गीत सादर केले,तसेच प्रा.स्मिता लाहोरे यांनी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला,
या कार्यक्रमाला इतर प्राध्यापक वृंद,शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा.छत्रपती दौलतकार यांनी केले,तद्नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.
Total Users : 10829